निदर्यी तीन मुली… बापाचा अंतिम संस्कार फक्त व्हिडिओवरून पाहिला, 13 व्यालाही आल्या नाहीत, नेटकरी संतापले
वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित न राहिलेल्या मुली, त्यांच्या तेराव्या दिवसाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिल्या नाहीत. त्या व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यविधीत सामील झाल्या, ज्यामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. अनेकांनी कमेंट

कौटुंबिक नात्यांना हादरवून टाकणारा एक अत्यंत भावुक प्रकार अलीकडेच समोर आला होता. एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध शिवचरण राम रतन गुप्ता यांचा ४ ऑगस्टला मृत्यू झाला होता. त्यांच्या तीन मुली होत्या, पण एकही मुलगी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आली नव्हती. त्यामुळे वृद्धाश्रमाच्यावतीने त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुली व्हिडिओ कॉलवर जोडल्या होत्या. अस्थी विसर्जनाच्या वेळीही मुली व्हिडिओ कॉलवरूनच जोडल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १३ दिवसांनंतर वृद्धाश्रमाच्यावतीने जेव्हा त्यांचे तेरावे करण्यात आले, तेव्हाही त्यांची एकही मुलगी आली नाही. शेवटी शिवचरण गुप्ता यांच्या तेराव्याला प्रसाद समाजातील लोकांच्यावतीनेच वाटण्यात आला. ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबईचे रहिवासी होते वृद्ध
मुंबईचे माजी मोठे कपड्यांचे व्यापारी शिवचरण राम रतन गुप्ता यांचा वयाच्या ७४ व्या वर्षी ४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. आयुष्यभर आपल्या मुलांना सांभाळणाऱ्या या वडिलांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या तीनही मुलींपैकी एकही त्यांच्याजवळ उपस्थित नव्हती. अस्थी विसर्जनानंतर आता तेराव्याच्या पारंपरिक विधीतही मुली आल्या नाहीत. त्यामुळे सोनीपतच्या सामाजिक संस्थांच्यावतीने त्यांची तेरावी करण्यात आली. हे पाहून काहींनी म्हटले की मुलींनी आता सर्वच मर्यादाच ओलांडल्या आहेत.
मुलींनी तेराव्यात सहभागी होण्यास दिला नकार
वृद्धाश्रम चालवणारे आनंद कुमार यांनी सांगितले की, मुलींनी तेराव्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. त्यामुळे सर्व प्रक्रिया सामाजिक संस्थेच्यावतीनेच पार पाडण्यात आली. त्यांनी सांगितले की, वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्यावतीने शिवचरण गुप्ता आजारी असल्याची माहिती आधीच त्यांच्या मुलींना देण्यात आली होती. त्यांच्या तीन मुलींपैकी एक नेपाळ, एक आजमगड आणि एक मुंबईतच राहते. पण वेळेच्या कमतरतेचे कारण देत तिघींनी येण्यास नकार दिला होता. मोठ्या मुलीने अंत्यसंस्कारासाठी ५१०० रुपये पाठवले होते, जे आश्रमाने त्यांना परत केले होते.
वृद्धाश्रमाचे संचालक आनंद कुमार आणि स्थानिक प्रबुद्ध वर्गाने या घटनेबाबत खूप चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, आधुनिक समाजात संस्कारांची कमतरता आणि वृद्धांची अशी उपेक्षा अत्यंत दुःखद आहे. तरीही या प्रकरणामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. पण हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. तर काहींनी शिवचरण यांच्या तीन मुलींना अतिशय निर्दयी असल्याचे म्हटले आहे. एकाने तर प्रश्न विचारला की, या तीन मुली कधी वृद्ध वडिलांना भेटायला तरी आल्या होत्या का? की फक्त वडिलांच्या पैशांवरच त्यांनी आयुष्य काढलं आहे.