AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांवर अखेर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार

मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दहा ते आकरा समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे आता अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांवर अखेर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार
Manoj Jarange Patil Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 9:35 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या महिला आंदोलक ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ललिता तारख यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांनी दोनदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अखेर या प्रकरणात आता ट्रोल करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या दहा ते आकरा समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली, त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु वाटेतच त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. ललिता तारख यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या प्रकरणात ललिता तारख यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती. त्यांनी दोनदा तक्रार दाखल केली. त्यानंतर आता या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून, दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

10 ते 11 जणांवर धमकी तसेच, महिलेवर अश्लील आरोप करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  जरांगे यांच्या आंदोलनातील सक्रिय महिला आंदोलक ललिता तारख यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ललिता तारख यांनी यापूर्वी 2 वेळेस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती,  त्यानुसार आता 5 जणांसह इतर अज्ञात 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हे दाखल झालेले काही जण फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम चॅनलचा वापर करतात. तर काही जण कमेंट करणारे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे दाखल झालेल्या समर्थकांची नावे

1. भगवानराव जाधव 2. D A उंबरे पाटील 3. बीबीशन लिंबाजी नन्नावरे 4. बळीराम मोरे 5. संतोष पाटील राहटिकर

तर अन्य पाच ते सहा अज्ञात समर्थकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना