Raphael Fighter Jets : बलशाली भारत! फ्रान्समधून आली आणखी तीन राफेल लढाऊ विमाने

| Updated on: Feb 23, 2022 | 8:54 PM

या तीन विमानांमुळे हवाई दलाच्या ताफ्यातील राफेल लढाऊ विमानांची संख्या आता 35 झाली आहे. भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने मिळवण्यासाठी करार केला होता. शेवटचे अर्थात 36 वे विमान काही आठवड्यांनंतर फ्रान्सहून भारतात पोहोचणार आहे. यापैकी 30 हून अधिक विमाने कोठेही न थांबता थेट भारतीय भूमीवर उतरवली आहेत.

Raphael Fighter Jets : बलशाली भारत! फ्रान्समधून आली आणखी तीन राफेल लढाऊ विमाने
फ्रान्समधून आली आणखी तीन राफेल लढाऊ विमाने
Follow us on

नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमधील तणावामुळे जगभरातील सर्वच देशांना सुरक्षेची चिंता सतावत आहे. या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर त्याचे गंभीर परिणाम सर्वच देशांना भोगावे लागणार आहेत. जगावर तिसर्‍या जागतिक महायुद्धाचे सावट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान भारतीय हवाई दल आणखी सामर्थ्यवान बनले आहे. शत्रुराष्ट्रांना जशास तसे उत्तर देण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल लढाऊ विमाने (Raphael Fighter Jets) दाखल होणार आहेत. ही विमाने फ्रान्समधून सुमारे आठ हजार किलोमीटर अंतर कापून भारतात पोहोचली आहेत. हवाई दला (Air Force)ने बुधवारी या विमानांची खूशखबर दिली. (Three Raphael fighter jets entered the Indian Force)

राफेल लढाऊ विमानांची संख्या आता 35

हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सची आणखी तीन राफेल लढाऊ विमाने भारतात पोहोचली आहेत. फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाने प्रवासादरम्यान विमानांना इंधन पुरवल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे. हवाई दलाने ट्विट केले की, या तीन विमानांमुळे हवाई दलाच्या ताफ्यातील राफेल लढाऊ विमानांची संख्या आता 35 झाली आहे. भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने मिळवण्यासाठी करार केला होता. शेवटचे अर्थात 36 वे विमान काही आठवड्यांनंतर फ्रान्सहून भारतात पोहोचणार आहे. यापैकी 30 हून अधिक विमाने कोठेही न थांबता थेट भारतीय भूमीवर उतरवली आहेत. राफेलचा समावेश झाल्यानंतर हवाई दलाची लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. फ्रान्सच लढाऊ उपखंडातील सर्वात लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे उल्का क्षेपणास्त्र, हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे हॅमर क्षेपणास्त्र आणि स्कॅल्प क्षेपणास्त्राने सज्ज आहे.

लष्करी शक्तीला चालना मिळणार

भारताने आणीबाणीच्या खरेदीअंतर्गत मिळवलेले हॅमर क्षेपणास्त्र 70 किमीवरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी केवळ 500 फूट उंचीवर सोडले जाऊ शकते. भारताच्या पूर्वेकडील क्षेत्रातील राफेलच्या सहभागामुळे या प्रदेशातील लष्करी शक्तीला चालना मिळणार आहे. राफेल लढाऊ विमाने आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहेत. सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या राफेल लढाऊ विमानात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. राफेल लढाऊ विमानांमध्ये 74 किलोग्रॅम न्यूटनची दोन एम88-3 साफ्रान इंजिन देण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने उड्डाण करताना एकमेकांना मदत करू शकतात. एका विमानाला दुसर्‍या विमानात इंधन पुरवण्यास ही विमाने सक्षम आहेत. राफेल ताशी 2,222.6 किलोमीटर वेगाने आणि 50 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. (Three Raphael fighter jets entered the Indian Force)

इतर बातम्या

Video: सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय Brahmin? चेन्नई महापालिकेतल्या भाजपच्या एकमेव विजेत्या नगरसेविका पुन्हा वादात का?

‘माजी ED अधिकाऱ्याला भाजपचं UPमध्ये तिकीट’ रोहित पवारांच्या वक्तव्यामागचा ‘तो’ BJP उमेदवार हाच!