पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता आहे का?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात?

| Updated on: Apr 27, 2021 | 11:38 AM

देशात रोज तीन लाखांच्यावर कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असून कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. (Time for a national lockdown to bend Covid curve?, know expert opinion)

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची आवश्यकता आहे का?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: देशात रोज तीन लाखांच्यावर कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असून कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनची गरज असल्याचं बोललं जात आहे. देशात खरोखरच देशव्यापी लॉकडाऊनची गरज आहे का? याबाबत तज्ज्ञांना काय वाटतं? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (Time for a national lockdown to bend Covid curve?, know expert opinion)

पीएचएफआय बेंगळुरूचे प्राध्यापक गिरीधर बाबू यांच्या मते, देशव्यापी लॉकडाऊन हा पर्याय आहे असं वाटत नाही. व्हायरस पसरत आहे. तो रोखण्याचा मार्ग आपल्याला माहीत नाही. एपिसेंटर्स काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कंटेन्मेंट झोनही आपण यशस्वी करू शकलो नाही. लॉकडाऊन शहर आणि जिल्हास्तरावर ठिक आहे. कोरोना रुग्णांचे आकडे कसे कमी होतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. लॉकडाऊनमुळे केवळ कोरोना रुग्णांच्या संख्येला आवर घालता येईल. पण कंटेन्मेंटमुळे खूप मदत होईल, असं प्रा. गिरीधर म्हणाले.

रणनीती बदलली पाहिजे

कोरोनाविरोधात लढण्यासाठी जो वेळ हवा आहे, तो लॉकडाऊनमुळे मिळतो. आता ऑक्सिजनची दुप्पट मागणी वाढली आहे. कर्नाटकमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा मोठा संकेत आहे. लॉकडाऊनच्या काळात लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे रणनीतीमध्ये बदल केला पाहिजे, असं कर्नाटक कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. विशाल राव यांचं म्हणणं आहे.

उपयोग नाही

देशव्यापी लॉकडाऊन लावल्याने काही उपयोग होणार नाही. ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी निर्बंध असले पाहिजे. देशव्यापी लॉकडाऊन केल्याने काय परिस्थिती निर्माण झाली होती. हे आपण पाहिलंच आहे. अशा वेळी लोकांच्या रोजी रोटीकडेही लक्ष दिलं पाहिजे. लॉकडाऊनचा थेट परिणाम रोजंदारी करणाऱ्या कामगारांवर पडतो, असं दिल्लीचे डॉ. शाहीद जमील यांनी सांगितलं. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. देशात लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. त्यातच नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. यावेळी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पसरला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

लोकल लॉकडाऊन हवा

गेल्यावेळी देशव्यापी लॉकडाऊन होता. त्यावेळी रुग्णसंख्या कमी होती. लॉकडाऊन करण्याचीही एक पद्धत आहे. परंतु सरकारकडे लोकांना दिलासा देण्याचा दुसरा पर्याय नाही. लोकल लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन तोडली जाईल, यावर विश्वास ठेवायला हवा, मुंबईच्या केअर रेटिंग्सचे चीफ इकनॉमिस्ट मदन सबनवीस यांनी सांगितलं. (Time for a national lockdown to bend Covid curve?, know expert opinion)

 

संबंधित बातम्या:

ज्युलिओ रिबेरो म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ झालेत, आता देवेंद्र फडणवीसांचं लेखानेच उत्तर!

हे तर भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र; संजय राऊतांचा दावा

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार

(Time for a national lockdown to bend Covid curve?, know expert opinion)