AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार

संतोष बांगर यांनी स्वतःची एफडी मोडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी खाजगी वितरकाला 90 लाख रुपये उपलब्ध करुन दिले (ShivSena MLA Santosh Bangar breaks his FD for remdesivir Injection purchase).

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार
शिवसेना आमदार संतोष बांगर
| Updated on: Apr 25, 2021 | 10:08 PM
Share

हिंगोली : राज्यातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. हिंगोली जिल्हा देखील या परिस्थितीला अपवाद नाही. हिंगोलीतही ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने कोरोनाबाधितांना आपला जीव गमावावा लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या भयान परिस्थितीत रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध व्हावा यासाठी कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी स्वत:ची एफडी मोडून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे (ShivSena MLA Santosh Bangar breaks his FD for remdesivir Injection purchase).

आमदारांनी इंजेक्शनसाठी 90 लाख दिले

संतोष बांगर यांनी स्वतःची एफडी मोडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी खाजगी वितरकाला 90 लाख रुपये उपलब्ध करुन दिले. या रकमेतून जिल्ह्यात 5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. बांगर यांच्या या प्रयत्नामुळे हिंगोल जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे (ShivSena MLA Santosh Bangar breaks his FD for remdesivir Injection purchase).

इंजेक्शनसाठी मेडिकल मालकांना 1 कोटी 40 लाख रुपयांची गरज होती

“जिल्हाधिकारी आणि मेडिकल असोसिएशन यांच्यात ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी 10 हजार इंजेक्शन दिलं जाईल, असा निर्णय झाला. त्यापैकी 5 हजार इंजेक्शन हे सरकारी रुग्णालयासाठी तर 5 हजार इंजेक्शन हे खासगी रुग्णालयांसाठी दिले जातील, असं ठरवण्यात आलं. त्यावेळी मेडिकल असोसिएशनमधील वितरक सदस्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. इंजेक्शनसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांचा आरटीजीएस करायचा होता. ही रक्कम कुठून द्यायची? असा प्रश्न मेडिकल मालकांपुढे उभा राहीला”, असं संतोष बांगर यांनी सांगितलं.

960 इंजेक्शन हिंगोलीत दाखल

“मेडिकचे मालक माझ्याजवळ आले. त्यावेळी मी माझ्या खात्यातील रक्कम देण्याचं ठरवलं. ज्या लोकांनी मला मोठं केलं त्या लोकांसाठी काम नाही केलं तर ते योग्य नाही. याशिवाय शिवसैनिकाला ते नाकारताही येणार नाही. त्यामुळे मी माझ्या खात्यातून आरटीजीएस मारुन घेतलं. आता 960 इंजेक्शन हिंगोली जिल्ह्यासाठी आले आहेत”, अशी प्रतिक्रिया बांगर यांनी दिली.

हिंगोलीत दिवसभरात तब्बल दहा जणांचा मृत्यू

हिंगोलीत दिवसभरात तब्बल दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर 90 जणांना कोरोनाची लागण झाली. हिंगोलीतील कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजार 685 वर पोहोचला आहे. त्यापैकी 10 हजार 78 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हिंगोलीत आज दिवसभरात 178 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सध्या 1384 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 196 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झालाय. तर 494 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

संतोष बांगर नेमकं काय म्हणाले ते बघा:

हेही वाचा : मोठी बातमी ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, पण मृतांच्या संख्येत मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती ?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.