2000 वर्षांनंतरच्या जगात पोहोचला, नंतर मशीनने पुन्हा परतला; आता केली जगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी

एक व्यक्ती टाइम ट्रॅव्हलरने 2000 वर्षांनंतरच्या जगात पोहोचल्याचा दावा केला आहे. त्यानंतर त्याची धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे.

2000 वर्षांनंतरच्या जगात पोहोचला, नंतर मशीनने पुन्हा परतला; आता केली जगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी
| Updated on: Aug 13, 2026 | 1:34 PM

सोशल मीडियावर नेहमी टाइम ट्रॅव्हलबाबत धडकी भरवणारे दावे केले जातात. टाइम ट्रॅव्हल करणारा एखादा व्यक्ती भविष्याबाबत भाष्य करतो. तर कोणी भूतकाळाबाबत भाष्य करत असतो. परंतु या दाव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नसतात. आता एक जुना दावा पुन्हा चर्चेत आला आहे. लुईस वॉकर नावाच्या जगाला धडकी भरवणारा दावा चर्चेत आलाय. हा व्यक्ती ट्राइम ट्रव्हलच्या माध्यमातून थेट 4413 सालात पोहोचला. त्यावेळी त्याला तिथे कोणताही माणूस सापडला नाही, असा दावा त्याने केला आहे.

वॉकर यांच्या दाव्यानुसार, तो 1977 साली ब्रिटेनच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये काम करत होता. त्यांच्या वडिलांनी ही नोकरी मिळवून दिली होती. त्याला हळूहळू गुप्त माहिती मिळू लागल्या. संसोधकांनी ट्राइम टेक्नॉलॉजी विकसित केलेल्या एका खोलीत बोलावलं गेलं. त्याला 600 वर्ष पुढे पाठवण्याचा प्रयत्न सुरू होता. यासाठी त्याला 2.5 लाख पाऊंड देण्याची बोली झाली होती. हा प्रकल्प यशस्वी होण्याची फक्त 50 टक्के यशस्वी होण्याची शक्यता होती. जर अयशस्वी झाल्यास काल-अवकाशातही हरवण्याची शक्यता होती. परंतु पैशासाठी वॉकर तयार झाले.

हेलिकॉप्टरने एका रात्री त्याला गुप्त तळावर नेण्यात आलं. त्यानंतर त्याला भकास इमारती, भुयारी मार्गातून पुढे जावं लागलं. त्याच्याजवळ टेलीपोर्टेशन आणि मन वाचण्याची अज्ञात उपकरणे होते. टाइम मशीन ही ताऱ्याला जोडलेली एक रचना होती. या त्रिकोणी आकाराच्या रचनेत व्यक्ती बसू शकत होती. त्याला रेडिएशनपासून संरक्षण मिळेल, असा सूट घालून मशीनमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर एक मोठा आवाज झाला. त्यानंतर सर्वत्र पांढरे झाले. वॉकर जागे झाल्यानंतर ते एका रुग्णालयात होते. त्यावेळी एका रोबोटिक आवाजाने त्यांना 4413 वर्षांत असल्याचे सांगितले.

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर उडणार्‍या गाड्या पाहिल्या. त्यानंतर माणसारखे रोबोट पाहिले. माणसाचं अस्तित्व कुठेच दिसलं नाही. त्यांनी एक व्यक्तीशी भेट झाल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने 2030 चा टाइम ट्रॅव्हलर असल्याचे सांगितले. 2028 साली टाइम ट्रॅव्हल सार्वजनिक होईल, असेही वॉकर यांनी सांगितले. वॉकर काही वेळ तिथे होते. त्यांनी सांगितले की, रोबोट्स खूप दयाळू आणि बुद्धिमान आहेत. त्यांनी वॉकर यांना 1977 सालात पुन्हा पाठवलं. त्यांनी सर्व कथा 2018 साली एका युट्यूब चॅनेलवर सांगितली होती. त्यावेळी त्यांचा चेहरा ब्लर दाखवला होता. आता त्यांचा दावा पुन्हा चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us