हा विखार थांबणार तरी कुठे? नाव बदलण्याची ही स्पर्धा थांबवा की राव…

| Updated on: Oct 07, 2022 | 9:11 PM

रेल्वेने दोन गाड्यांची नावे बदलली असून त्यामुळे टिपू एक्स्प्रेसचे नावही बदलले गेले आहे.

हा विखार थांबणार तरी कुठे? नाव बदलण्याची ही स्पर्धा थांबवा की राव...
Follow us on

बेंगळुरुः केंद्र सरकारकडून आता नवनवे नियम लागू केले जात आहेत. त्याच प्रमाणे अनेक वास्तूंची आता नावंही बदलण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे रेल्वे विभागाने (Railway) आता टिपू एक्सप्रेसचे (Tipu Express) नाव बदलून (Change of name)  वोडेयार एक्सप्रेस केले गेले आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून पत्रही जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक 12613-12614 म्हैसूर-बेंगळुरू टिपू एक्सप्रेसचे नाव बदलून वोडेयार एक्सप्रेस करण्यात आले आहे. या रेल्वे बरोबरच आता भारतीय रेल्वेकडून आणखी दोन गाड्यांची नावं बदलण्यात आली आहेत.

रेल्वेने दोन गाड्यांची नावे बदलली असून त्यामुळे टिपू एक्स्प्रेसचे नावही बदलले गेले आहे. आता या रेल्वेचे नाव वोडेयार एक्स्प्रेस करण्यात आले आहे.

यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस काढले असून त्यामध्ये म्हटले आहे की ट्रेन क्रमांक 12613-12614 म्हैसूर बेंगळुरू टिपू एक्सप्रेसचे नाव बदलून वोडेयार एक्सप्रेस केले गेले आहे.

रेल्वे बोर्डाचे उपसंचालक राजेश कुमार यांनी या ट्रेनची नावं बदलण्यासाठी अधिकृत पत्र जाहीर केले आहे. तलगुप्पा-म्हैसूर एक्सप्रेस या दुसऱ्या ट्रेनचे नावही बदलण्यात आले आहे.

आता या ट्रेनचे नवीन नाव कुवेम्पू एक्सप्रेस असणार असून आणखी काही रेल्वेंची नावं बदलाचा विचार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

याशिवाय नुकतेच भारतीय रेल्वेने 500 मेल एक्सप्रेस गाड्यांचाही वेग वाढवला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात 500 मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग 10 मिनिटांवरून 70 मिनिटांपर्यंत वाढवला गेला आहे.

या शिवाय 65 जोड्या म्हणजेच 130 गाड्यांचे सुपरफास्ट श्रेणीत रूपांतर करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या मतानुसार सर्व गाड्यांच्या सरासरी वेगात सुमारे 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जादा गाड्या चालवण्यासाठी सुमारे पाच टक्के जादा मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.