घराघरात वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या हॉकर्सला एका पेपरमागे किती रुपये मिळतात? आकडा ऐकून बसेल धक्का

तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की दिवसभर एवढे काबाड कष्ट करणाऱ्या पेपर विक्रेत्याची कमाई किती असेल, त्याला दर एक पेपरमागे किती रुपये भेटत असतील, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

घराघरात वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या हॉकर्सला एका पेपरमागे किती रुपये मिळतात? आकडा ऐकून बसेल धक्का
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2025 | 8:38 PM

एक काळ असा होता, जेव्हा तुमच्या सकाळची सुरुवात ही पेपरवाल्याच्या धावपळीनं आणि खडखडाटानं व्हायची. गल्ली-गल्लीमध्ये वृत्तपत्र वाटणारे हॉकर्स तुम्हाला दिसून यायचे. प्रत्येक घरामध्ये जगातल्या काना-कोपर्‍यातील बातमी पोहोचवण्याची जबाबदारी या वृत्तपत्र विक्रेत्यांवर असायची, आता हे चित्र काही प्रमाणात कमी झालं आहे, मात्र आजही पेपरवाले भय्या पाहाटेच आपल्या सायकलवर वृत्तपत्राचा गठ्ठा टाकून, ठरलेल्या परिसरात घराघरांमध्ये पेपर टाकण्याचं काम करतात. त्यांच्यामुळेच आपण आजही सकाळी चहासोबत पेपर वाचण्याचा आनंद घेतो.

मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की दिवसभर एवढे काबड कष्ट करणाऱ्या पेपर विक्रेत्याची कमाई किती असेल, त्याला दर एक पेपरमागे किती रुपये भेटत असतील, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. एका वृत्तपत्र विक्रेत्यानं दिलेल्या माहितीनुसार आजच्या काळात एका पेपरची किंमत ही पाच ते आठ रुपये एवढी आहे. पेपरच्या किंमतीवर पेपर विक्रेत्याचं कमिशन अवलंबून असतं. त्याला एका पेपरमागे 1.5 ते 2.5 रुपये मिळतात. हे पेपर विक्रेते एखाद्या पेपर एजन्सीकडून पेपर विक्रीसाठी भाड्यानं घेतात. पेपर विकल्यानंतर मिळालेल्या कमाईमधून आपलं ब्रोकरेज वजा करून उरलेली रक्कम त्या पेपर एजन्सीला देतात.

समजा एखादा हॉकर्स दर दिवसाला जर 200 वृत्तपत्राची विक्री करत असेल आणि जर त्याला एका पेपर मागे दीड रुपया मिळत असेल तर त्याची दिवसाची कमाई ही 300 रुपये इतकी होते. या हिशोबाने त्याला दर महिन्याला 9 हजार रुपये मिळतात. अर्थात पेपरच्या कमिशनमध्ये कमी -जास्त होऊ शकते, त्यामुळे हा सर्व हिशोब लक्षात घेतला तर एक पेपर विक्रेता दर महिन्याला पंधरा ते सोळा हजार रुपये कमावतो. या पैशांमधूनच तो आपलं घर चालवतो.

मात्र सध्या आता मोबाइलचं युग आलं आहे, त्यामुळे अनेक जणांना मोबाईलवरच बातम्यांची माहिती मिळते, सर्व माहिती ही एका क्लिकवर अवलंबून असते, त्यामुळे अनेकांनी आपल्या घरी येणारा रोजचा पेपर देखील बंद केला आहे, त्यामुळे या व्यावसायात आता पूर्वी सारखं मार्जीन राहिलं नसल्याचं पेपर विक्रेते सांगतात.