किती प्रमाणात दारु पिऊन कार चालवता येते ? अपघात झाल्यास इंश्योरन्स क्लेम होतो का ?

भारतीय कायद्यात दारु पिऊन ड्रायव्हींगची करण्याची परवानगी मिळते काय ? दारुचे किती प्रमाण असेल तर तुम्ही सुटु शकता ? काय आहे BAC लिमिट ? वाचा संपूर्ण माहिती....

किती प्रमाणात दारु पिऊन कार चालवता येते ? अपघात झाल्यास इंश्योरन्स क्लेम होतो का ?
drunk and drive
| Updated on: Nov 08, 2026 | 8:10 PM

जर कार चालवताना तुमच्या रक्तात दारुचे नेमके किती प्रमाण सापडल्यास तुम्ही कायद्यातून सुटू शकता. रक्तात जर alcohol किती कमी प्रमाण आढळले तर तुम्ही वाचू शकता? म्हणजेच रक्तात अल्कोहोलची(BAC- blood alcohol content ) लिमिट नेमकी किती असते ? जर अशा स्थिती तुमच्या कारचा अपघात झाला तर काय ? तुम्ही कारच्या विम्याचा वापर(Insurance Claim) करु शकता काय ? चला तर या अशाच काही प्रश्नांची उत्तरे ?

आज आपण भारतात नशेत कार चालवण्यासंदर्भात नियम काय आहेत ? विमा अधिकारी या संदर्भात काय सल्ला देत आहेत हे त्यांच्या तोंडून ऐकूयात…

Loading...

खाजगी वाहन चालकासाठी वैध BAC काय आहे ?  What’s legal BAC for private vehicle drivers?

विमा अधिकारी रमित गोयल यांच्या मते भारतात खाजगी वाहन चालकांसाठी बीएसी म्हणजे ब्लड अल्कोहल कन्टेन्टची लिमिट 0.03 टक्के (100ml रक्तात 30mg अल्कोहल) निश्चित केली आहे.

ते म्हणाले की वाणिज्यिक वाहन चालकांसाठी तर परमिसिबल लिमिट झीरो आहे. याचा अर्थ व्यापारी वाहनासाठी अल्कोहॉलचे जराही प्रमाण चालत नाही. जर तुम्ही कार चालवताना बीएसी जर निश्चित केलेल्या लिमिटनुसार असेल तर तांत्रिक रुपाने तुम्हाला मद्याच्या नशेत कार चालवली असे मानले जात नाही.

 

मात्र, जेव्हा मोटर विमा पॉलिशीचा विषय येतो तेव्हा भारतातली बहुतांशी पॉलिसी कंपन्या, मग त्या सर्वसमावेशक असोत किंवा तृतीय-पक्षीय, त्यांमध्ये सहसा “मद्यपान करून वाहन चालवण्यासंबंधी” (driving under the influence) कलमाचा समावेश करतात.

 

गोयल स्पष्ट करताना म्हणाले की कायदा तुम्हाला निश्चित प्रमाणात अल्कोहॉलच्या अंशाची अनुमती देत असले तरी विमा कंपन्यांनी असा क्लॉज ठेवला आहे ज्यात जर ड्रायव्हर अपघाताच्या वेळी दारुच्या वा ड्रग्सच्या नशेत सापडला तर त्यात कंपन्या कव्हरेज देत नाहीत.

तुमच्या रक्तात भलेही BAC लिमिटमध्ये अल्कोहॉल सापडले असेल तरी या केसमध्ये अपघात झाल्यास इंश्योरन्स कंपन्या तुमच्या क्लेम फेटाळण्याचा दावा करु शकतात. कारण यात ठरवलेल्या मर्यादेत जरी तुम्ही मद्य सेवन केले असेल तरी मद्य तुमच्या निर्णय घेण्याची क्षमता, प्रतिक्रिया टाईमला प्रभावित करु शकते.

 

मोटर वाहन कायदा 1988 या दंडाची तरतूद

मोटर वाहन कायदा 1988 मध्ये मद्य वा ड्रग्सच्या नशेत ड्रायव्हरला होणाऱ्या दंडात्मक कारवाईची माहिती दिली आहे. यात दंड, ड्रायव्हींग लायसन्स रद्द करणे आणि गंभीर अपघात झाल्यानंतर जेल देखील होऊ शकते.

गोयल यांनी इशारा देत सांगितले की जर पोलिसांना कळले की तुम्ही नशेत वाहन चालवत होता., कायदेशीर सीमेच्या खाली वा त्याहून कमी प्रमाणत, तरी हे तुमच्या विम्याच्या क्लेमला प्रभावित करु शकते. विमा कंपन्या हे निश्चित करण्यासाठी अपघात स्थळी पोलिसांचा रिपोर्ट आणि पुराव्यांआधारे अपघाताला दारु जबाबदार होती की नाही याची छाननी करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us