लॉकडाऊन इफेक्ट! गेल्या वर्षभरात देशात धुम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत घट

| Updated on: May 31, 2021 | 1:06 PM

भारतात दरवर्षी तंबाखू सेवन आणि धुम्रपानामुळे 13 लाख जणांचा मृत्यू होता. | Tobacco consumption and smoking

लॉकडाऊन इफेक्ट! गेल्या वर्षभरात देशात धुम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत घट
धुम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत घट
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात कोरोनामुळे देशाला अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले असले तरी या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या कोरोनाकाळात देशातील तंबाखू सेवन (Tobacco) करणाऱ्या आणि धुम्रपान (Smoking) करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे निदर्शनास आले आहे. (Tobacco consumption and smoking percentage decreases in country says dr harsh vardhan)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. भारतात दरवर्षी तंबाखू सेवन आणि धुम्रपानामुळे 13 लाख जणांचा मृत्यू होता. आकडेमोड करायची झाल्यास हे प्रमाण दिवसाला 3500 इतके आहे. मात्र, गेल्या वर्षभरात देशातील धुम्रपान आणि तंबाखू सेवनाचे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी झाले आहे. यापूर्वी हे प्रमाण 34.6 टक्के होते ते आता 28.6 टक्के इतके झाले आहे.

‘धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका’

तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आणि धुम्रपानाची सवय असलेल्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका 40 ते 50 टक्के अधिक असतो. या व्यसनांमुळे फक्त फुफ्फुसे, हृदय आणि कर्करोगच होत नाही तर शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होतो, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

दहा दिवसात नव्या कोरोना रुग्णांमध्ये एक लाखांहून अधिक घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) गेले दहा दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता 21 मे ते 31 मे या कालावधीत नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या 50 दिवसांतील हा 24 तासांच्या कालावधीतला निचांकी आकडा आहे.

ज्या आकडेवारीनुसार कालच्या दिवसात 1 लाख 52 हजार 734 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 128 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या:

टरबुजातून तंबाखू आणि दारु, कोरोनाग्रस्तांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांची शक्कल

Nagpur | नागपुरात सुगंधी तंबाखू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई

लॉकडाऊनमुळे तंबाखू पुरवून पुरवून खाण्याची वेळ, मित्राने पुडी न दिल्याने मारहाण

(Tobacco consumption and smoking percentage decreases in country says dr harsh vardhan)