शेअर बाजारावर मंदीचं सावट? घसरणीचं चक्र थांबेना, गुंतवणुकदारांमध्ये चलबिचल

फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्यास आर्थिक मंदीचं सावट निर्माण होण्याची भीती गुंतवणुकदारांत आहे. त्यामुळे शेअर बाजारातून विक्रीचा ओघ कायम आहे. जून महिन्यात आतापर्यंत 25 हजार कोटी शेअर्सची विक्री झाली आहे.

शेअर बाजारावर मंदीचं सावट? घसरणीचं चक्र थांबेना, गुंतवणुकदारांमध्ये चलबिचल
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 6:46 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (SHARE MARKET) सलग पाचव्या दिवस घसरणीचं सत्र कायम राहिलं. आज (गुरुवारी) सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारादरम्यान शेअर बाजारात उसळी निर्माण झाली. मात्र, दिवसभराच्या सत्रात तेजी टिकविण्यात अपयश आलं. शेअर बाजारात आज सेन्सेक्स 1046 अंकांच्या घसरणीसह 51,496 च्या स्तरावर आणि निफ्टी 332 अंकांच्या घसरणीसह 15361 च्या टप्प्यावर बंद झाला. आज सेन्सेक्स वरील सर्व सेक्टर इंडेक्स घसरणीसह बंद झाले. सर्वाधिक नुकसान छोट्या स्टॉक्सच्या गुंतवणुकदारांचे (SMALL STOCKS INVESTOR) झाले. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्यास आर्थिक मंदीचं सावट निर्माण होण्याची भीती गुंतवणुकदारांत आहे. त्यामुळे शेअर बाजारातून विक्रीचा ओघ कायम आहे. जून महिन्यात आतापर्यंत 25 हजार कोटी शेअर्सची विक्री झाली आहे.

व्याजदरात वाढ?

शेअर बाजारातील घसरणीला अनेक कारण कारणीभूत ठरली आहे. फेडरल रिझर्व्ह वर्ष 2022-23 साठी अमेरिकाच्या विकास दराच्या अंदाजात अपेक्षित घट असल्याचे निरीक्षण नोंदविलं आहे. फेडरल रिझर्व्ह वर्ष 2022 साठी 1.75% व्याजदरात वाढ करण्याची अंदाज अर्थजाणकारांनी वर्तविला आहे.

आज शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. मात्र, व्यवहार दरम्यान शेअर बाजारात विक्रीचा ओघ कायम राहिला. शेअर बाजारात घसरणीसह बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचा मार्केट कॅप तब्बल 5.5 लाख कोटींनी घटला आहे. आज सर्वाधिक घसरण टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये झाली. विप्रो, टेक महिंद्रा, भारती एअरटेल शेअर्स 4-4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

गुंतवणुकदारांना ‘जीएसटी’ची धास्ती

केंद्र सरकार वस्तू व सेवा कर संरचनेत (जीएसटी)संरचनात्मक बदल करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमूहाची महत्वाची बैठक होणार आहे. येत्या 17 जून रोजी होणाऱ्या बैठकीत जीएसटी करसंचनेविषयीच्या बदलाविषयी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्य सरकारांसह उद्योग जगताच्या नजरा राजधानी दिल्लीतील बैठकीकडे खिळल्या आहेत.

गुंतवणुकदारांचे 27 लाख कोटींवर पाणी!

चालू वर्षी शेअर बाजाराची कामगिरी गुंतवणुकदारांसाठी निराशाजनक राहिली आहे. चालू वर्षी शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 27 लाख कोटींवर पाणी सोडावं लागले आहे. 31 जानेवारी 2021 रोजी बीएसई वर लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप 2,66,00,211.55 कोटी रुपयांचा होता. तर आजच्या तारखेला 16 जून 2022 मार्कट कॅप घसरणीसह 2,38,94,886.41 कोटींवर पोहोचला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.