
General Reservation : रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्थेत एक मोठा बदल होत आहे. 1 ऑक्टोबरपासून सामान्य आरक्षित तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल करण्यात येणार आहे. आता ऑनलाईन बुकिंगसाठी रेल्वे विभागाने आधार व्हेरिफिकेशन, पडताळा अनिवार्य केला आहे. आधार पडताळा करणे बंधनकारक झाल्याने तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना मोठी चपराक बसणार आहे. सामान्य तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 15 मिनटांपर्यंत केवळ आधार व्हेरिफाईड प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. त्यामुळे दलालांच्या काळाबाजारावर अंकुश येईल. तिकीट बुकींगचा दुरुपयोग थांबवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे.
अगोदरची 15 मिनिटं केवळ आधारसह बुकिंग
रेल्वे मंत्रालयाच्या नवीन निर्णयानुसार, सकाळी 8:00 ते 8:15 वाजेदरम्यान तिकीट बुक करण्यासाठी आधारसह बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाचा परवानगी देण्यात येईल. यामुळे जे सर्वसामान्य प्रवाशी आहे. रोज प्रवास करतात. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दलालांमार्फत अगोदर तिकीट बुक होत असल्याने त्यांना तिकीट कधी कधी उपलब्ध होत नाही. मग त्यांना वेटिंगवर राहावे लागते.
दुरूपयोग थांबवण्यासाठी मोठे पाऊल
रेल्वे खात्याच्या माहितीनुसार, या व्यवस्थेमुळे तिकीटांचा दुरुपयोग आणि बोगस बुकिंग प्रक्रियेला लगाम बसेल. तिकीटांचा काळाबाजार होणार नाही. प्रवास करणाऱ्या यात्रेकरूनाही तिकीट बुकिंग करता येईल. त्यांना वेटिंगवर राहावे लागणार नाही. सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना अडचण येणार नाही. तिकीट आरक्षित झाल्याचा फटका त्यांना सहन करावा लागणार नाही.
आरक्षण केंद्रावर नियम लागू नाही
हा नियम केवळ ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी लागू आहे. रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर तिकीट बुक करताना या नियमाचा फटका बसणार नाही. केंद्रावर तिकीट खरेदी करताना या नियमाचा फटका बसणार नाही. रेल्वे आरक्षण केंद्रावर तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एंजटला अगोदरच मनाई
सामान्य तिकीट बुकिंग आरक्षण सुरू होताच सुरुवातीच्या 10 मिनिटात तिकीट एजंटवर तिकीट बुकिंग न करण्याचा नियम अगोदरच लागू आहे. नवीन बदल हा यात्रेकरुंचे हित लक्षात घेऊन लागू करण्यात आला आहे.