आता ट्रेनमध्ये मिळणार विमानासारखी सुविधा, रेल्वे प्रवासाचा अनुभव बदलण्याची योजना
भारतीय रेल्वे प्रवासाचा अनुभव संपूर्णपणे कायापालट करणाऱ्या एका योजनेचा रेल्वे अभ्यास करत असून ही योजना जर लागू झाली तर रेल्वे प्रवासाचा अनुभव संपूर्णपणे बदलणार आहे.

भारतीय रेल्वेतून प्रवास करण्याचा अनुभव येत्या काळात संपूर्णपणे बदलू शकतो. आता प्रवाशांना ट्रेनमध्ये फ्लाईट सारखी बिझनस क्लासची सुविधा देण्याची तयारी सुरु आहे.अहमदाबादच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझाईन (NID) च्या विद्यार्थ्यांनी एक खास प्रीमियम एक्झीकेटीव्ह पॉड कॉन्सेप्ट तयार केली आहे. ज्यात प्रायव्हसी, आराम आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचे खास ध्यान राखण्यात आले आहे. हे पाऊल रेल्वे प्रवासाला अधिक लक्झरी आणि सुविधाजनक बनवण्याच्या दिशेने महत्वाचे म्हटले जात आहे.
ही योजना खासकरुन हाय-स्पीड ट्रेनना ध्यानात घेऊन डिझाईन केली आहे. यात प्रवाशांना एक प्रकारचे खाजगी केबिन ( प्रायव्हेट पॉड ) मिळेल.यात ते आरामात बसण्याशिवाय झोपू देखील शकतील. आसने एर्गोनॉमिक डिझाईनवर आधारित असतील. त्यामुळे लांबच्या प्रवासातही थकवा जाणवणार नाही.
या प्रीमियम पॉडमध्ये व्यक्तीगत लायटिंग, पुरेसे स्टोरेज आणि छोटा वर्कस्पेस या सारख्या सुविधा देखील सामील आहेत. याशिवाय यात प्रवाशांना चांगली कनेक्टिव्हीटी आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीने परिपूर्ण इंटेरिअरचा अनुभव मिळेल. जो सध्या ट्रेन कोच पेक्षा खूपच वेगळा आहे. या योजनेला भारतीय रेल्वे आणि NID च्या सहकार्याने स्थापित रेल्वे डिझाईन सेंटर (RDC) च्या अंतर्गत विकसित केले आहे. याचा उद्देश्य प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला करणे आणि भविष्यातील गरजांनुसार ट्रेन डिझाईन तयार करणे आहे.
केव्हापासून लागू होणार ?
सध्या ही केवळ एक कॉन्सेप्ट डिझाईन आहे आणि यास लागू करण्यासंदर्भात अजून अधिकृत निर्णय झालेला नाही. रेल्वे अधिकारी सध्या या मॉडेलचा अभ्यास करत आहे. आणि याच्या व्यवहारिकतेवर विचार केला जात आहे. जर ही योजना लागू झाली तर भारतीय रेल्वेत प्रीमियम ट्रॅव्हल सेगमेंटला नवीन दिशा मिळू शकते. खास करुन बिझनस ट्रॅव्हलर्स आणि हाय-एंड प्रवाशांसाठी हा एक आकर्षक पर्याय सिद्ध होऊ शकतो. ज्यामुळे ट्रेनच्या प्रवासा संपूर्ण अनुभव बदलू शकतो.