Bhopal Lokayukta Raid : आलिशान कार, 40 खोल्यांचा बंगला आणि थाट, पगार म्हणाल तर फकस्त 30 हजार

| Updated on: May 12, 2023 | 10:41 AM

Bhopal Lokayukta Raid : भोपाळमधील एका सरकारी अभियंत्याच्या बंगल्यावर धाड टाकण्यात आली. त्यांचा पगार अवघा 30 हजार रुपये आहे, पण त्यांच्या संपत्ती, दागिने, लक्झरी कार आणि मिळकतीची मोजणी अद्यापही संपलेली नाही..

Bhopal Lokayukta Raid : आलिशान कार, 40 खोल्यांचा बंगला आणि थाट, पगार म्हणाल तर फकस्त 30 हजार
वारेमाप कमाई
Follow us on

भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपाळ येथे लोकायुक्तांनी (Lokayukta Raid) गुरुवारी एका अभियंत्याच्या बंगल्यावर धाड टाकली. एवढी संपत्ती पाहून सर्वच चक्रावले. या महिला प्रभारी सहायक अभियंत्याचा (Government Engineers) पगार अवघा 30 हजार रुपये आहे. या छाप्या दरम्यान त्यांच्याकडे 30 लाखांचा टीव्ही, 50 परदेशी कुत्रे, थारच नाही तर 10 आलिशान कार आणि मोठी रोकड सापडली. आता या मॅडमकडे इतका पैसा कोणत्या जादूई शक्तीने आला याचा पोलीस तपास करत आहे. पण त्यांच्या संपत्ती, दागिने, लक्झरी कार आणि मिळकतीची मोजणी अद्यापही संपलेली नाही..

संपत्तीची मोजदाद सुरुच
मध्य प्रदेश पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या प्रभारी सहायक अभियंता हेमा मीणा यांनी संपत्तीचा हा प्रकार केला आहे. त्यांच्या बिलखिरीया येथील बंगल्यावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी घबाड सापडले. केवळ 30 हजार पगार असलेल्या मीणा यांच्याकडे संपत्तीचा खजिनाच सापडला. त्याची मोजदाद अद्यापही सरु आहे.

232 टक्के संपत्ती
लोकायुक्त पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मीणा यांचा पगार पाहता ही संपत्ती वारेमाफ आहे. मीणा यांनी 13 वर्षांची सेवा दिली आहे. त्यात त्यांनी अमाप मेवा खाला यात काही शंका नाही. 30 हजारांच्या नोकरीत त्यांची कमाई 232 टक्के अधिक असल्याचा एक अंदाज लावण्यात येत आहे. पण ही संपत्ती त्यापेक्षा अधिक असण्याचीच शक्यता जास्त आहे.

हे सुद्धा वाचा

40 खोल्यांचा बंगला
सहायक अभियंता असलेल्या हेमा मीणा या त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या 20 हजार चौरस फुट जागेवरील बंगल्यात राहतात. या बंगल्यात 40 खोल्या आहेत. बाजारभावानुसार याची किंमत एक कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांच्याकडे 50 हून अधिक विविध जातीचे कुत्रे आढळले आहे. या कुत्र्यांची किंमत लाखांमध्ये आहे. 60-70 वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत.

वॉकी टॉकीचा वापर
या आलिशान बंगल्यात एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी मीणा वॉकी टॉकीचा वापर करतात. त्यांच्याकडे बंगला, गायी, कुत्रे, शेती सांभाळण्यासाठी अनेक कर्मचारी, मजूर आहेत. वॉकी टॉकीवरुनच मीणा त्यांच्यासी व्यवहार करतात. त्यांच्या बंगल्यात पोळी, चपाती करण्याचे मशीन पण आढळले. 2.50 लाखांचे हे मशीन कुत्र्यांना पोळ्या करण्यासाठी वापरात होते.

30 लाखांचा एक टीव्ही
हेमा मीणा यांच्या आलिशान बंगल्यात छापा टाकल्यानंतर एका खोलीत 30 लाखांचा टीव्ही सेट सापडला. या टीव्ही वापरत नसल्याचे दिसून आले. तो सीलबंद असून एका बॉक्समध्ये सापडला. सोबतच 2 ट्रक, 1 टँकर आणि महिंद्रा थार सह 10 महागड्या कार बंगाल्याच्या आवारात सापडल्या.2020 मध्ये त्यांच्याविरोधात मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार करण्यात आली होती.