अयोध्येतील राम मंदिरासाठी एक पाऊल पुढे; ‘टीव्ही 9’ कडून 11 कोटींचा चेक!

अयोध्येती भव्यदिव्य राम मंदिर साकारण्यासाठी टीव्ही 9 वृत्तवाहिनीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. (TV9 group donate 11 crore for ayodhya ram mandir)

अयोध्येतील राम मंदिरासाठी एक पाऊल पुढे; टीव्ही 9 कडून 11 कोटींचा चेक!
| Updated on: Jan 23, 2021 | 12:51 PM

नवी दिल्ली: अयोध्येती भव्यदिव्य राम मंदिर साकारण्यासाठी ‘टीव्ही 9’ वृत्तवाहिनीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. ‘टीव्ही 9 ग्रुप’, ‘माय होम’ आणि ‘मेघा इंजीनियरिंग इंडिया लिमिटेड’ने राम मंदिरासाठी भरघोस योगदान दिलं आहे. टीव्ही 9 नेटवर्कच्या प्रोमोटर्संनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटींचा चेक सुपूर्द केला आहे. त्यामुळे राम मंदिर निर्माणास मोठा हातभार लागला आहे. (TV9 group donate 11 crore for ayodhya ram mandir)

राम मंदिर उभारण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जनतेकडून भरभरून मदत मिळत आहे. अनेक लोक स्वत:हून पुढे येऊन राम मंदिरासाठी मोठं योगदान देत आहेत. सामान्य माणसांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांनीच राम मंदिरासाठी आपले हात मोकळे सोडले आहेत. त्यातच टीव्ही 9 नेटवर्कच्या प्रोमोटर्संनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटींचा चेक सुपूर्द केला आहे. माय होम ग्रुपचे चेअरमन रामेश्वर राव यांनी 5 कोटी तर मेघा इंजीनियरिंगचे सीएमडी कृष्णा रेड्डी यांनी 6 कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे.

भैयाजी जोशाीही उपस्थित

श्री त्रिदंड चिन्ना जीयर रामानुज स्वामींच्या नेतृत्वात शुक्रवारी हैदराबादमध्ये समर्पण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. माय होमचे चेअरमन रामेश्वर राव आणि मेघा इंजीनियरींगचे सीएमडी कृष्णा रेड्डी यांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी आरएसएसचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी 11 कोटींचा चेक दिला.

राम मंदिरासाठी अनेकांकडून देणग्या

राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

उद्धव ठाकरे तीन कोटी देणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येत गेले होते, तेव्हा त्यांनी राम मंदिराला 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी विहिंपकडून देण्यात आली आहे. (TV9 group donate 11 crore for ayodhya ram mandir)

 

संबंधित बातम्या:

राम मंदिर निर्माणासाठी राज्यपाल कोश्यारींचा पुढाकार, 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक

राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार : विहिंप

(TV9 group donate 11 crore for ayodhya ram mandir)