राम मंदिर निर्माणासाठी राज्यपाल कोश्यारींचा पुढाकार, 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 15, 2021 | 9:50 PM

आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिला आहे.

राम मंदिर निर्माणासाठी राज्यपाल कोश्यारींचा पुढाकार, 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिला आहे. नागपुरात आजपासून निधी संकलनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना राज्यपाल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. या मंदिरासाठी खूप यात्रा निघाल्या, श्रीराम यांनी पूर्ण देशाला ऐक्यात बांधून ठेवले आहे. राम फक्त राम नाही आहे. तर आमच्या सर्वांसाठी एक राष्ट्र आहे, असंही राज्यपाल म्हणाले. (Governor Bhagat Singh Kosharis gave fund of Rs 1 lakh 11 thousand for construction of Ram temple)

ते पुढे म्हणाले की, खूप मोठ्या संघर्षानंतर आम्ही राम मंदिर बनवत आहोत. मात्र, संकल्प अजून अपूर्ण आहे. आपल्याला देशात राम राज्य आणायचे आहे. देश एका योग्य दिशेत चालला आहे. प्रत्येक घरात जाऊन योगदान घ्यायचे आहे. भव्य दिव्य राम मंदिर तयार होणार. यात सगळ्यांचा सहभाग असणे गरजेचे असल्याचं यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं.

नागपुरातील पोद्दरेश्वर राम मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अयोध्या राम मंदिर ट्रस्ट कडून स्वामी अवधेशानंद गिरी महाराज उपस्थित होते. श्रीरामाची आरती करत या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी संघ परिवारातील लोकांसह इतर रामभक्तसुद्धा उपस्थित होते.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कामासाठी विश्व हिंदू परिषदेने (VHP) राम मंदिर निर्माण सहयोग अभियान (मदतीची मोहीम) सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषदेने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडे 5 लाख 100 रुपयांचा धनादेश सोपवला आहे. आज विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांच्यासह अनेक हिंदू संघटनांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या भेटीदरम्यान कोविंद यांनी मंदिरासाठी 500100 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. (Governor Bhagat Singh Kosharis gave fund of Rs 1 lakh 11 thousand for construction of Ram temple)

संबंधित बातम्या

‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस

Ayodhya : राम मंदिर ट्रस्टला 200 किलो चांदीची देणगी, चांदीदान थांबवण्याची वेळ

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराचं निर्माण हे भाजपचं स्वप्न : लालकृष्ण आडवाणी

(Governor Bhagat Singh Kosharis gave fund of Rs 1 lakh 11 thousand for construction of Ram temple)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI