
भारतातील सर्वात आघाडीचे न्यूज नेटवर्क टीव्ही 9 नेटवर्कने जर्मनीत न्यूज 9 ग्लोबल समिट आयोजीत केले आहे. या समिटचे दुसरे पर्व 9-10 ऑक्टोबर दरम्यान जर्मनीत आयोजीत करण्यात आले आहे. उद्यापासून हा वैचारिक कुंभमेळा दोन देशांदरम्यान भरणार आहे. जागतिक पातळीवर मोठे बदल होत आहे. भारत ही उभरती जागतिक अर्थव्यवस्था म्हणून स्वाभिमानाने आणि गर्वाने समोर येत आहे. यंदा न्यूज9 ग्लोबल समिटचा विषय ‘लोकशाही, लोकसंख्याशास्त्र,विकास : भारत-जर्मनी संबंध’ असा आहे. या समिटरव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी टीव्ही 9 नेटवर्कला शुभेच्छा देतानाच दोन्ही देशांचे संबंध अधिक वृद्धींगत होतील अशी आशा व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
टीव्ही9 नेटवर्कने न्यूज9 ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. येत्या 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी जर्मनीत समिटचं दुसरं पर्व पार पडणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 नेटवर्कला शुभेच्छा दिल्या. तसेच या मुळे जर्मनी-भारताचे संबंध मजबूत होईल, अशी आशा व्यक्त केली.
टीव्ही 9 नेटवर्कच्या प्लॅटफॉर्मवर जर्मनी आणि भारताचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. जर्मनी हा युरोपमधील औद्योगिक क्रांती आणि विकासाचा बालेकिल्ला आहे. विशेष म्हणजे भारत आणि विशेषतः महाराष्ट्राशी या देशाचे घनिष्ठ संबंध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शीपणामुळे हे संबंध वृद्धींगत होतील. ग्रीन हायड्रोनजन, स्मार्ट मोबॅलिटी,डिजिटल इनोव्हेशन, स्कील डेव्हलपमेंट या क्षेत्रासह इतर क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध मजबूत होतील. भारत आणि युरोपातील फ्री ट्रेड कराराचा उल्लेख करत दोन्ही देशांमध्ये आर्थिक पूल बांधण्याचा काम करेल असे देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला. बाडेन-वुर्टेमबर्ग आणि मुंबई या सिस्टर सिटी असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशात येत्या काही वर्षात होणाऱ्या विविध भविष्यातील योजनांवर मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले.
टीव्ही9 नेटवर्कने न्यूज9 ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. येत्या 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी जर्मनीत समिटचं दुसरं पर्व पार पडणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 नेटवर्कला शुभेच्छा दिल्या. तसेच या मुळे जर्मनी-भारताचे संबंध मजबूत होईल, अशी आशा… pic.twitter.com/xsHuYVsPUw
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2025
जर्मनीत चर्चा सत्र; कोण सहभागी होणार?
जर्मनीतील चर्चा सत्रात एयरबस डिफेन्स अँड स्पेसचे आंतरराष्ट्रीय प्रमुख कार्ल-हेंज ग्रॉसमॅन, सायबर सुरक्षेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अलेक्झांडर शेलॉन्ग, श्वार्झ डिजिट्स; राजिंदर सिंह भाटिया, अध्यक्ष, इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स सोसायटी; चंद्रशेखर एचजी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, SASMOS HET टेक्नॉलॉजीज; अंकित मेहता, सह-संस्थापक आणि सीईओ, आइडियाफोर्ज टेक्नॉलॉजी; आणि कॅप्टन (एन) माइकल गिस, कमांडर, प्रादेशिक कमांड, बाडेन-वुर्टेमबर्ग हे सहभागी होतील.