TSRTC : धावत्या बसमध्ये बाळांना जन्म; सरकारचे आजन्मासाठी अविस्मरणीय ‘बर्थडे गिफ्ट’!

तेलंगाणा(Telangana)च्या एसटी महामंडळा(TSRTC)ची बातमी सध्या चर्चेचा विषय ठरलीय. तेलंगाणा महामंडळाच्या बसमध्ये वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये महिलांनी मुलींना (Baby Girl Birth)जन्म दिला. दोन्ही मुलींना तेलंगाणा सरकार(Telangana Government) ने आजन्म मोफत प्रवासाची भेट दिली आहे.

TSRTC : धावत्या बसमध्ये बाळांना जन्म; सरकारचे आजन्मासाठी अविस्मरणीय बर्थडे गिफ्ट!
टीएसआरटीसी
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 8:18 PM

हैदराबाद : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातातील एसटी(MSRTC)च्या चाकांना ब्रेक लागला आहे. मात्र, महाराष्ट्राचे सीमावर्ती राज्य असलेल्या तेलंगाणा(Telangana)च्या एसटी महामंडळा(TSRTC)ची बातमी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तेलंगाणा महामंडळाच्या धावत्या बसमध्ये वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये महिलांनी मुलींना (Baby Girl Birth)जन्म दिला. धावत्या सार्वजनिक बसमध्ये जन्माला आलेल्या दोन्ही मुलींना तेलंगाणा सरकारने आजन्म मोफत प्रवासाची भेट दिली आहे. सुरक्षित प्रवासाचं ब्रीद तेलंगाणा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जपल्याचं सांगत मुख्यमंत्री केसीआर राव यांनी चालक-वाहकांवर कौतुकांची थाप टाकली आहे.

लाईफ ऑन व्हील
तेलंगाणा राज्य परिवहन महामंडळाद्वारे आंतरराज्यीय बस सेवेसोबतच हैदराबाद शहराअंतर्गत वाहतूक सेवा पुरविली जाते. परिवहन महामंडळाच्या बसमध्ये तेलंगाणातील मेहबूबनगर आणि सिद्धापेठ जिल्ह्यात प्रसूतीच्या घटना समोर आल्या. वाहकाच्या सर्तकतेमुळे प्रवाशी गर्भवती महिलांची डिलिव्हरी गाडीत सुखरुप पार पडली. दोन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये घडलेल्या प्रसूतीच्या बातम्यांनी समाज माध्यमांचे विश्व व्यापून टाकले आहे.

आजन्म मोफत; कधीही अन् कुठेही
तेलंगाणा सरकारने जन्माला आलेल्या मुलींना आजन्म मोफत प्रवासाची सवलत बहाल केली आहे. तेलंगाणा परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्हीसी सज्जनार यांनी मुलींना आंतरराज्यीय प्रवासासोबत विमानतळ स्पेशल बस गाड्यांमध्ये सवलत लागू असल्याचे ट्विटरद्वारे घोषित केले आहे.

वाहकाची सतर्कता, चालकाचे प्रसंगावधान
महबूबनगर जिल्ह्याच्या पेद्दाकोत्तापल्ली गावानजीक धावत्या बसमध्ये 30 नोव्हेंबरला महिलेने मुलीला जन्म दिला. तर 7 डिसेंबरला सिद्धीपेठ जिल्ह्यामध्ये धावत्या बसमध्येच महिलेच्या सुखरुप प्रसूतीची घटना समोर आली. गर्भवती महिलांना प्रवासादरम्यान त्रास जाणवू लागला. वेदनेने व्याकूळ झालेल्या महिलांकडे सहप्रवाशांनी वाहकाचे लक्ष वेधले. त्यावेळी बसच्या चालक व वाहकांनी प्रसंगावधना राखत सुखरुप प्रसूती पार पाडली. डिलिव्हरीनंतर तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दोन्ही महिलांसह नवजात बालकांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बस मेकओव्हरचा ‘सज्जनार पॅटर्न’
तेलंगाणा सरकारने परिवहन महामंडळाची सूत्रे व्ही. एस. सज्जनार यांच्याकडे सोपविली आहेत. आयपीएस अधिकारी असलेले सज्जनार आपल्या दबंग कारवाईसाठी ओळखले जातात. तेलंगाणा परिवहन महामंडळाचा कायापालट करण्यासाठी सज्जनार यांनी मोठी पावले उचलली आहेत. सुरक्षित प्रवासासोबत महामंडळाला नफ्यात आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. तेलंगाणा महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करणे सक्तीचे केले आहे.

Sharad pawar : ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटल्यानंतर पहिल्यांदाच पवार-सोनिया गांधी भेट, चर्चा गुलदस्त्यात

’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश

Nashik| नाशिकमध्ये 14 खतविक्रेत्यांचे परवाने रद्द; 10 लाखांचा साठा जप्त