AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश

स्मार्ट सिटीज मिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या इट स्मार्ट सिटीज चॅलेंजमध्ये ठाणे शहराचा समावेश झाला आहे.

’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश
ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 6:18 PM
Share

ठाणे: स्मार्ट सिटीज मिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या इट स्मार्ट सिटीज चॅलेंजमध्ये ठाणे शहराचा समावेश झाला आहे. देशातील पहिल्या 20 शहरांच्या यादीत ठाण्याचा समावेश झाला असून महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव महापालिका ठरली आहे.

15 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत देशातील सर्व 100 स्मार्ट शहरांसह एकूण 109 शहरांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी निवडलेल्या शहरांना मिलान अर्बन फूड पॉलिसी पॅक्ट, फूड फाऊंडेशन यासह इतर आंतरराष्ट्रीय तज्ञांसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत या शहरांना आपले सादरीकरण करावे लागणार आहे. यासोबतच शहराला खाद्यपदार्थाबाबत जागरूक आणि संवेदनशील बनवण्यासाठी पुढील तीन वर्षांची रणनीती आखण्यात येणार आहे. स्कोअरकार्ड, व्हिजन फॉर्म आणि सादरीकरणात मिळालेल्या गुणांच्या आधारे टॉप 11 शहरांची निवड करण्यात येणार आहे.

या शहरांचा समावेश

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तपणे काम केले. अन्न परवाना, खाद्यपदार्थ नोंदणी, इट राइट कॅम्पस, इट स्मार्ट स्कूल, स्वच्छता रेटिंग, अन्न भेसळीची ऑन स्पॉट तपासणी या आव्हानांसाठी विहित केलेल्या कामांवर व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. प्राथमिक निवड चाचणीत ठाणे, आग्रा, अजमेर, भोपाळ, बेंगलोर, चंदीगड, इंदोर, जबलपूर, पणजी, पटना, राजकोट, सागर, शिमला, सुरत, तुमाकुरू, तिरुनेलवेली, बडोदा, उज्जैन, जम्मू आणि रौरकेला आदी शहरांची निवड करण्यात आली आहे.

ठाणेकरांचे आरोग्यही स्मार्ट हवं

दरम्यान, दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी स्मार्ट सिटी ठाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ठाणे शहरातील नागरिकांना अत्यावश्यक पायाभूत स्मार्ट सुविधा देण्यासोबत त्यांचे आरोग्यही स्मार्ट राहिले पाहिजे यासाठी ठाणे महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याचा विश्वास महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी व्यक्त केला. एफएसएसएआय यांच्या सहकार्याने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व स्मार्ट सिटी लि. यांच्यावतीने शहरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इट राईट स्कूल” कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शहराचा विकास करताना नागरिकांना फक्त पायाभूत सुविधा न देता त्यांचा आरोग्य चांगले राहण्यासाठी महापालिका प्रयत्ननशील आहे. स्मार्ट शहरासोबत इथे स्मार्ट नागरिक तसेच स्मार्ट मुले राहतात यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. केंद्र शासनाच्या सुरक्षित खाणं, शाश्वत खाणे या स्पर्धेत देशामध्ये पहिल्या 20 मध्ये ठाणे महापालिकेनं स्थान मिळविले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. बदलत्या काळानुसार सध्या सकस आहार घेणे महत्वाचे आहे. शिक्षकांनी लहान मुलांना सकस आहार खाण्याच्या दृष्टीने चांगल्या सवयी लावल्या तर या मुलांच्या माध्यमातून त्या संपूर्ण कुटूंबापर्यंत सहज पोहचल्या जातील. पर्यायाने संपूर्ण देशात होणाऱ्या या स्पर्धेत महापालिका नक्कीच यश संपादन करेल असा विश्वास महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

St worker strike : कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात-सूत्र

Obc reservation : ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक, या मागण्यांसाठी उतरणार रस्त्यावर

कोरेगाव भीमाच्या विकासासाठी 100 कोटी, शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य सरकार पार पाडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.