कोरेगाव भीमाच्या विकासासाठी 100 कोटी, शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य सरकार पार पाडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

कोरेगाव भीमाच्या विकासासाठी 100 कोटी, शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य सरकार पार पाडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा
dhananjay munde

कोरेगाव भीमाच्या विकासासाठी राज्य सरकार 100 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारच पार पाडणार आहे, अशी घोषणार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 14, 2021 | 5:55 PM

मुंबई: कोरेगाव भीमाच्या विकासासाठी राज्य सरकार 100 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारच पार पाडणार आहे, अशी घोषणार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विजयस्तंभ ही एक ऐतिहासिक धरोहर असून लाखो अनुयायांचे प्रेरणा स्थळ आहे. या स्थळाचा विकास व सुशोभीकरण केले जावे यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंतचा बृहत विकास आराखडा तयार करा. हा विकास आराखडा एक महिन्याच्या आत सादर करावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आदेश मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच हा बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

भूसंपादनाला वेग येणार

दरम्यान विजयस्तंभ व परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी पुणे, यांच्या मार्फत भूसंपादन प्रक्रियेचा 30% निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याने आता या प्रक्रियेला वेग येणार आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समिती

1 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. दरवर्षी 1 जानेवारी रोजी देशभरातून आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात, त्यांना आवश्यक सोयी सुविधा तसेच विजयस्तंभ व परिसराचा विकास कमीत कमी वेळेत केला जावा. त्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, या अनुषंगाने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आता सरकारच कार्यक्रम करणार

शौर्यादिनाचे आयोजन व नियोजन देखील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत केले जाणार आहे. 1 जानेवारी, 2022 च्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन केले जावे, तसेच या अभिवादन कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे नियोजन केले जावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विजयस्तंभवर यापुढे होणाऱ्या सर्व अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी देखील सामाजिक न्याय विभागाने घेतली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra Vidhan Parishad Election Result: अकोल्यात विश्वासाला तडा गेला, विधान परिषदेतील पराभवानंतर शिवसेनेची खदखद

Obc reservation : ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक, या मागण्यांसाठी उतरणार रस्त्यावर

राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला; भाई जगतापांनी सांगितलं वेगळं कारण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें