मुलींना बोलवायचे, नको ते करून व्हिडीओ काढायचे, सरकारी शाळेत शिक्षकांचं हादरवणारा कांड; देश हादरला!
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन शिक्षकांनी मिळून विद्यार्थीनीवर जबरदस्ती केली. नंतर नको ते केले आणि त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकीकडे भारत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला तर दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आदराच्या नात्याला अक्षरश: काळीमा फासण्यात आला आहे. एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांवर अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित काही आक्षेपार्ह व्हिडिओ देखील समोर आले आहेत. यानंतर शिक्षण विभागाने दोन्ही शिक्षकांना निलंबित केले असून मुख्याध्यापकांनाही अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील आहे. आरोपी शिक्षकांची ओळख अरविंद कुमार आणि वीरेंद्र प्रसाद अशी झाली आहे. शिक्षण विभागाने दोघांनाही निलंबित केले आहे. अरविंद कुमार यांची २०२४ मध्ये बीपीएससी टीआरईच्या माध्यमातून नोकरी मिळवली होती. तर वीरेंद्र कुमार २०१३ मध्ये बदलीनंतर शाळेत रुजू झाले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद इमाम अली अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हे प्रकरण दाब्याचा आणि दोन्ही आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याची माहिती दिली आहे.
आरोपी शिक्षक अरविंद कुमार यांचे व्हिडिओ क्लिप्स स्थानिक सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे गावकऱ्यांनी दोन्ही शिक्षकांना पकडून मारहाण केली. हे प्रकरण हळूहळू उघडकीस आले, त्यानंतर बक्सर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाने गुरुवारी एक निवेदन जारी करून सांगितले की, स्थानिक रहिवाशांनी वीरेंद्र प्रसाद आणि अरविंद कुमार या दोन शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
दोन्ही शिक्षक निलंबित
निवेदनात म्हटले आहे की, ३१ ऑगस्ट रोजी डुमरांव ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांनी (बीईओ) तक्रारीच्या आधारे आपला तपास अहवाल जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे (डीईओ) सादर केला. त्यानंतर डीईओने २ सप्टेंबर रोजी दोन्ही शिक्षकांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे स्वतंत्र आदेश जारी केले.
तक्रारीत विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणे, एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणे आणि ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे त्यांना धमक्या देणे यासह गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच, शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अहवालात म्हटले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी शाळेची विद्यार्थिनी नव्हती.