अमेरिकेची शरणागती? इराणचा सर्वात मोठा विजय, ट्रम्प जगासमोर उघडे पडले

स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे अमेरिकेनं इराणसमोर शरणागती पत्कारली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात असून, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा जगासमोर उघडे पडले आहेत.

अमेरिकेची शरणागती? इराणचा सर्वात मोठा विजय, ट्रम्प जगासमोर उघडे पडले
trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 8:20 PM

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र युद्धविराम होऊन देखील अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूज बंदच आहे. त्यावर अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही, मात्र आता इराणमधून मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे अमेरिकेच्या सुपरपावर होण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. इराणकडून युद्धविरामानंतरही स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून एका दिवशी केवळ 15 च जहाजं जातील अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकेनं होर्मूज सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केली, आम्ही होर्मूजमधून एकही जहाज जाऊ देणार नाही अशी घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली होती. मात्र अमेरिकेच्या या नाकेबंदीचा इराणवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं पहायला मिळत आहे. इराणची दोन मोठी जहाजं अमेरिकेच्या नाकावर टिच्चून स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून पार झाले आहेत, हा इराणने अमेरिकेला दिलेला मोठा धक्का मानला जात आहे.

अमेरिकेनं केलेल्या घोषणेनंतर देखील इराणचे दोन जहाजं स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून पार झाले आहेत, आणि त्यावर अमेरिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. समुद्री जहाजांचं रेकॉर्ड ठेवणारी कंपनी कपीअरच्या आकडेवारीमधून ही बातमी समोर आली आहे. या कंपनीच्या आकडेवारीनुसार अमेरिकेने होर्मूज सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदीची घोषणा केल्यानंतर इराणचे दोन जहाजं या मार्गाने गेले आहेत. मात्र असं असताना देखील अमेरिकेकडून या जहाजांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये.एवढंच नाही तर एक चीनंच जहाज देखील या मार्गाने गेलं आहे. आमच्या व्यवहारामध्ये अमेरिकेनं पडू नये, असा इशारा देखील चीनकडून अमेरिकेला देण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून स्ट्रीट ऑफ होर्मूज पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. इराणचा तेल पुरवठा थांबावा हा त्या मागचा उद्देश होता. मात्र अमेरिकेनं हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केल्यानंतर देखील अमेरिकेच्या नाकावर टिच्चून दोन जहाजं या मार्गाने बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेवर आणि अमेरिकेच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेची थट्टा केली जात आहे.

Follow Us