AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्रिशा कृष्णनवर अश्लील टिप्पणी, थेट घरातून घेतलं ताब्यात; आता माजी उपमुख्यमंत्री म्हणतायत “माझं काय चुकलं?”

अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी अर्थाची टिप्पणी केल्याने तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले, वाचा..

त्रिशा कृष्णनवर अश्लील टिप्पणी, थेट घरातून घेतलं ताब्यात; आता माजी उपमुख्यमंत्री म्हणतायत माझं काय चुकलं?
थलपती विजय आणि त्रिशा कृष्णनImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2026 | 1:08 PM
Share

अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणं डीएमके नेते आणि माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना चांगलंच महागात पडलं आहे. भरसभेत त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना थेट त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी त्रिशाचं नावसुद्धा घेतलं नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. उदयनिधी हे तंजावरमध्ये कावेरी पाणीप्रश्नाशी संबंधित आंदोलनाचं नेतृत्व करत होते. त्यावेळी त्यांनी सभेत त्रिशाबद्दल नाव न घेता टिप्पणी केली होती. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली.

ताब्यात घेतल्यानंतर एका वाहिनीशी बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, “मी काही चुकीचं म्हटलं का? मी मुख्यमंत्र्यांशिवाय कोणा दुसऱ्याचं नावसुद्धा घेतलं नाही. मी काहीच चुकीचं केलं नाही. यापेक्षा जास्त मला यावर काहीच बोलायचं नाही.” उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून यावेळी घटनास्थळी बराच गोंधळ निर्माण झाला होता.

स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

तंजावरमधील सभेत उदयनिधी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांच्यावर निशाणा साधत होते. यादरम्यान प्रेक्षकांमधून “त्रिशा, त्रिशा..” अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्रिशाचं नाव ऐकताच उदयनिधी हसले आणि म्हणाले, “पाणी इतरत्र कुठे पोहोचू दे किंवा न पोहोचू दे.. पण तिथे मात्र आवर्जून पोहोचलं पाहिजे.. मी कावेरीबद्दल म्हणत होतो.” या टिप्पणीनंतर टीव्हीकेनं त्यांच्याविरोधात थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली.

तमिळनाडू भाजपचे मुख्य प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्या तुरुंगवासाची मागणी केली. ते म्हणाले, “उदयनिधी यांनी केलेली दुहेरी अर्थाची वक्तव्ये ही अत्यंत लज्जास्पद, अश्लील आणि घृणास्पद आहेत. कोणत्याही सुसंस्कृत व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठावर अशी असभ्य भाषा वापरू नये.”

तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यातील नातं कायमच चर्चेत राहिलं आहे. विजय यांची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज करताना त्यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून त्रिशाचं नाव विजय यांच्यासोबत जोडलं जात आहे. विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही पत्नी-मुलांची अनुपस्थिती आणि त्रिशाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...