हातात तलवार, जळत्या चितेवरचं मांस चवीने खाल्लं…अघोरी किन्नरचा किळसवाणा प्रकार पाहून संताप!
उज्जैन येथील एका स्मशानात अघोरी किन्नर साधक काली उर्फ नंद गिरी यांचा पेटत्या चितेसमोरील एक भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात मानवी मांसाचा भाग खाण्याचा दावा केल्याने प्रचंड खळबळ माजली. तसेच संत समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका स्मशानातून अघोरी साधनेचा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिथे एक अघोरी किन्नर साधक काली उर्फ नंद गिरि तलवार हातात घेऊन पेटत्या चितेसमोर उभा असून मृतदेहाच्या शरीराचा भाग खाण्याचा दाव करत आहे. मात्र हा भयानक व्हिडीओ समोर येताच संत समाजाने नाराजी व्यक्त करत ही अघोरी परंपरा मर्यादेच्या बाहेर असल्याची टीका केली आहे. अघोरची एक मर्यादा असते आणि तंत्र-मंत्र क्रिया या गोपनीय ठेवणं गरजेचं असतं, त्याचं असं सार्वजनिक प्रदर्शन योग्य नाही, असं महामंडलेश्वर शैलेशानंद गिरि यांनी म्हटलं . तर अघोरी अखाड्याचे पीठाधीश्वर आणि राष्ट्रीय अध्यक्ष खड़ेश्वरी अघोरी बाबा विष्णुनाथ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. सनातन आणइ अघोर परंपरेच्या नायवाखाली पाखंड पसरवणाऱ्यां विरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
उज्जैनच्या चक्रतीर्थ स्मशान घाटावरून किन्नर अघोरीच्या जळत्या चितेतून मांस काढून खात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ किन्नर अखाड्याशी निगडीत काळी उर्फ नंद गिरि यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओनंतर माजली खळबळ
मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे संत समाज आणि सामान्य लोकांमध्ये नाराजी आहे. अनेकांनी याला अमानवीय संबोधत अघोरीविरुद्ध FIR नोंदवून कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता असं सांगितलं जातंय की, या अघोरी किन्नराला गडकाळिका माता मंदिरातील वादानंतर किन्नर अखाड्यातून बाहेर काढलं गेलं होतं.
व्हायरल झाला व्हिडीओ
व्हायरल व्हिडिओमध्ये काली उर्फ नंद गिरी हातात तलवार घेऊन दिसत आहेत. ते मनुष्य खाण्याची गोष्ट करतात. त्यानंतर ती व्यक्ती चक्रतीर्थ शवशिंशान घाटीला जळत असलेल्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहचते. व्हिडिओमध्ये काही मंत्र पाठ केल्यानंतर तलवार अंत्यसंस्काराच्या ठिकाणी घालते आणि कथितरित्या मांसाचा तुकडा बाहेर काढला जातो, असं दिसतं. मात्र ती व्यक्ती ते कच्चं खाते. कालीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
संत समाज भडकला
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामंडलेश्वरांकडून शैलेशनंद महाराज यांनी यावर तक्रार नोंदवली आहे. अघोरांची स्वतःची मर्यादा आहे, त्या कृती गोपनीय ठेवणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे, त्यांना सार्वजनीक करता येत नाही. जो साधक हे सार्वजनिक करतो तो कालनेमि साधक म्हणवू शकतो, तो पदभ्रष्ट साधक असू शकतो, असं त्यांनी म्हटलं.
पूर्वीही अशा प्रकारच्या घटनांचा सामना झाला आहे जे काही चैनलच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आल्या, पण साधू संतांच्या तक्रारीनंतर काही भाग धूसर आणि गोपनीय करण्यात आला. महामंडलेश्वर शेलीशनंद यांनी आरोप केला की अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणे कुठेतरी हिंदू वैदिक धर्माचा अपमान करत आहे. एकंदरच हा व्हिडीओ समोर येताच प्रचंड खळबळ माजली असून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे.