MP: तुरुंगात असल्यामुळे सेक्सचा आनंद घेता आला नाही, तरुणाने सरकारकडे मागितले इतके कोटी

सेक्सचा आनंद घेता न आल्याने तुरुंगातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या मागणीमुळे सरकार हादरलं

MP: तुरुंगात असल्यामुळे सेक्सचा आनंद घेता आला नाही, तरुणाने सरकारकडे मागितले इतके कोटी
कांतीलाल भील यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते.
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 04, 2023 | 2:10 PM

मध्यप्रदेश : दोन वर्षे तुरुगांत (jail)असलेल्या तरुणाच्या मागणीची संपुर्ण मध्यप्रदेशात (MP) चर्चा आहे. एका खोट्या बलात्काराच्या केसमध्ये तरुणाला अडकवण्यात आलं होतं. तो निर्दोष असल्याचं सिध्दं झाल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तो बाहेर आल्यानंतर त्याने मला दोन वर्षे सेक्सचा (Sex)आनंद घेता आला नाही. त्यामुळे त्याने सरकारकडे दहा हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.

ज्या व्यक्तीने सरकारकडे मागणी केली आहे. त्यांच्या कुटुंबियामध्ये एकूण पाच लोक आहेत. दोन मुलं, पत्नी आणि आई असा त्यांचा परिवार आहे. त्या व्यक्तीचं नाव कांतीलाल भील असं आहे. मागच्या दोन वर्षात त्याचं आयुष्य पुर्णपणे बदललं आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाला साधे कपडे खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते असं त्यांनी सांगितलं आहे.

“मी खरं तर देवाच्या कृपेमुळे बाहेर आलो आहे, कारण माझी केस लढण्यासाठी वकिलांना एक रुपाया सुध्दा दिलेला नाही” असं कांतीलाल भील यांनी अशी माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबियांची मोठी हानी झाली आहे. त्याची भरपाई मी सरकारकडे मागत आहे.

मध्यप्रदेशात तरुणाच्या मागणीमुळे सगळीकडे या गोष्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर दोन वर्षे मला सेक्सचा आनंद घेता आला नाही म्हणून कांतीलाल भील यांनी दहा करोड रुपयांची मागणी केली आहे.

कांतीलाल भील यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. महिलेने ज्यावेळी कांतीलाल भील यांच्याकडे मदत मागितली त्यावेळी भील यांनी महिलेवरती जंगलात नेऊन अत्याचार केले असा आरोप केला होता. त्यामुळे भील यांना दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली.