धक्कादायक, कॉकरोचबद्दल जे बोलले नाहीत, तेच तोंडी घालून केंद्रीय मंत्री पीयूष गोयलांना कोणी आणलं अडचणीत?

Piyush Goyal AI Deepfake Video: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर त्यांचे व्हायरल होणारे कथित वक्तव्य खोटे असल्याचा आणि ते AI च्या माध्यमातून डीपफेक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

धक्कादायक, कॉकरोचबद्दल जे बोलले नाहीत, तेच तोंडी घालून केंद्रीय मंत्री पीयूष गोयलांना कोणी आणलं अडचणीत?
पीयूष गोयल
| Updated on: Jul 25, 2026 | 9:29 AM

Piyush Goyal AI Deepfake Video: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा त्यांचा कथित व्हिडिओ हा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचा दावा केला आहे. AI च्या माध्यमातून डीपफेक व्हिडिओ तयार केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या मते संसदे बाहेर बोलत असताना त्यांनी जे वक्तव्य केले, त्यासोबत छेडछाड करण्यात आली. AI च्या मदतीने व्हिडिओ तयार करण्यात आला. लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. गोयलने याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

AI च्या मदतीने तयार केला डीपफेक व्हिडिओ

पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर याविषयी एक वक्तव्य केले. त्यानुसार, संसदेबाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या वक्तव्याशी छेडछाड करण्यात आली. AI च्या मदतीने डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आला. तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. लोकांना चुकीचा संदेश देण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. असे प्रकार लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी, खोटी माहिती पसरवण्यासाठी करण्यात येतात.

पोलिसांमध्ये तक्रार, चाणक्यपुरी स्टेशनमध्ये FIR

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 25 जुलै 2026 रोजी सकाळी 4:35 वाजता नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. खोटा व्हिडिओ तयार करणे, सोशल मीडियावर तो प्रसारीत करणे आणि अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांनी केली. तर नागरिकांनी कोणतीही माहिती केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह स्त्रोतावरूनच पडताळून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. भारतातील तरुण असा बनावट AI माहितीला, व्हिडिओला बळी पडणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्हायरल व्हिडिओत काय?

सोशल व्हिडिओवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कथितरित्या त्यांच्या तोंडी काही वाक्य घुसवल्याचा आरोप आहे. या व्हिडिओत “माझे असे स्पष्ट मत आहे की, आम्ही दोन ते तीन कॉक्रोचला सार्वजनिकरित्या लटकवले पाहिजे, तरच या कॉक्रोच जनता पार्टीला आमची शक्ती लक्षात येईल. जेव्हा या दोन ते तीन कॉक्रोचांना ते लटकलेले पाहतील, तेव्हाच हा सर्व गोंधळ शांत होईल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us