AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक वास्तव! ज्या मुलीवर कुटुंबाने केले अंत्यसंस्कार, ती 4 वर्षानंतर घरी परतली

खरंतर महिलेला जिवंत पाहिल्यानंतर कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची झोपच उडाली. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

भयानक वास्तव! ज्या मुलीवर कुटुंबाने केले अंत्यसंस्कार, ती 4 वर्षानंतर घरी परतली
| Edited By: | Updated on: Oct 08, 2020 | 11:24 AM
Share

गाजीपूर (उत्तर प्रदेश) : जन्म आणि मृत्यू हा प्रकृतीचा नियम आहे. जन्मणाऱ्या प्रत्येकाला मरण अटळ आहे. मेल्यानंतर कोणीही परत येत नाही असं म्हणतात. पण अगदी या उलट एक भयानक, काळजाचं पाणी करणारी घटना समोर आली आहे. गावात एकच खळबळ उडाली जेव्हा मृत्यूच्या 4 वर्षांनंतर एक महिला पुन्हा आपल्या घरी परतली. खरंतर महिलेला जिवंत पाहिल्यानंतर कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची झोपच उडाली. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (up police dead woman returned alive after 4 years ghazipur news)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेवर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले होते. तिच्या अकाली जाण्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पण मृत्यूच्या 4 वर्षानंतर महिला तिच्या लहान मुलीसोबत जिवंत घरी परतली. जेव्हा तिने संपूर्ण घटना कुटुंबाला सांगितली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये समोर आला आहे. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तब्बल 4 वर्षांआधीची आहे. महिला विवाहित आहे. तिला एक लहान मुलगीदेखील आहे. उपचारादरम्यान, महिलेला तिच्या कथित काका आणि मावशीने बेशुद्ध करून चिमुकलीसह देहविक्रीसाठी नेलं. तिथेही महिलेला 2 वेळा खरेदी आणि विकलं गेलं. पण यादरम्यान, एका व्यक्तीच्या मदतीने महिला तिच्या गावी सुखरूप परतली.

महिलेच्या चुलत भावाने सांगितलं की, आम्ही सगळ्यांनी ताईचा खूप शोध घेतला. पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे मृत्यू झाल्याचं समजत आम्ही तिचा पुतळा तयार केला आणि अंत्यसंस्कार केले. या दुःखात वडिलांचाही मृत्यू झाला. आईलाही गमवावं लागलं. सध्या घरी चुलत भाऊ, बहिण आणि त्यांचं कुटुंब राहतं.

महिलेने सांगितलेल्या घटनेनंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. पोलिसांनी आरोपी काका आणि मावशीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या – 

पगार मिळवण्यासाठी शिक्षकाचा अजब फंडा, अशा ठिकाणी संसार थाटला की सगळेच हादरले

कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी Good News, रोज फक्त 28 रुपयांच्या खर्चावर मिळवा बक्कळ पैसे

(up police dead woman returned alive after 4 years ghazipur news)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.