भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतरही अमेरिकेची मुजोरी कायम, चोराच्या उलट्या बोंबा, माफी सोडून थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. त्यामध्येच भारतीय जहाजावर अमेरिकेने हल्ला केला. याचा निषेध भारताने केला. मात्र, अमेरिकेने माफी मागायची सोडून थेट स्वत:चीच मुजोरी करण्यास सुरूवात केली.

भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतरही अमेरिकेची मुजोरी कायम, चोराच्या उलट्या बोंबा, माफी सोडून थेट..
Attack on an Indian ship
| Updated on: Jun 14, 2026 | 9:10 AM

पलाऊचा ध्वज असलेल्या जहाजावर अमेरिकेने मोठा हल्ला केला. एक दोन नाही तर तब्बल तीन जहाजांवर हल्ला केला. त्यापैकी एक भारतीय जहाज होते तर दुसऱ्या पलाऊचा ध्वज असलेल्या जहाजात भारतीय खलाशी होते. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात तब्बल 3 भारतीय खुलाशांचा मृत्यू झाला. भारताने या घटनेनंतर संताप व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये जहाजावरील हल्ले मान्य करणार नसल्याचेही स्पष्ट केले. भारतीय जहाजांना ओमानच्या आखातात अमेरिकेने टार्गेट केले. भारतीय जहाजावर हल्ला करूनही अमेरिकेने माफी मागण्यास नकार दिला. हेच नाही तर चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्याप्रमाणे अमेरिकेने मोठा वेगळाच दावा केला. अमेरिकेने म्हटले की, या जहाजांनी अमेरिकेच्या नाकेबंदीचे उल्लंघन केले. इराणी तेलाची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला.

जहाजावरील कर्मचाऱ्यांना वारंवार आदेश दिले. मात्र, त्यांनी पालन केले नाही, असे सांगून अमेरिकेने थेट त्यांच्या कारवाईचे समर्थन केले. याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रायलाचे मुख्य उपप्रवक्ते टॉमी पीगॉट यांनी निवेदन सादर केले. अमेरिकेने भारतीय जहाजावर केलेल्या हल्ल्यानंतर दिल्लीने तीव्र आक्षेप घेतला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्काे रूबिओ यांच्याशी चर्चा केली.

या गोष्टीचा भारताने कडाडून विरोध केला. अशा हल्ल्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करू शकत नसल्याचे भारताने स्पष्ट सांगितले. भारतीय जहाजावर इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला करूनही अमेरिकेने माफी मागण्यास नकार दिला. अमेरिकेची मुजोरी पुन्हा एकदा बघायला मिळतंय. होर्मुज खाडीत सुरक्षा आणि शांतता ठेवण्याकरिता सर्वांनी अमेरिकेच्या लष्कराने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे अमेरिकेने उलट म्हटले.

अमेरिकेच्या नाकेबंदीचे उल्लंघन आणि इराणी तेलावरील बेकायदेशीर वाहतूक खपवून घेणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले. ज्यामुळे वाद अजून वाढण्याची शक्यता आहे. आज इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार होणार आहे. तसा दावा अमेरिकेच्या अध्यक्षांनी केला. एकदा इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाला की, त्यानंतर थेट होर्मुज खाडी पूर्णपणे सुरू होणार आहे.

Follow Us