Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनेईंबद्दल धक्कादायक माहिती समोर, लीक ऑडिओ क्लिपमुळे जगभरात खळबळ, इराण टेन्शनमध्ये

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असतानाच आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेईंबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑडिओ क्लीप व्हायलर झाल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे.

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनेईंबद्दल धक्कादायक माहिती समोर, लीक ऑडिओ क्लिपमुळे जगभरात खळबळ, इराण टेन्शनमध्ये
mojtaba khamenei
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 6:26 PM

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलने इराणला धमकी देखील दिली होती की, इराण जेवढ्यावेळेस सर्वोच्च नेत्याची निवड करेल -तेवढ्या वेळेस आम्ही त्यांना मारू. दरम्यान त्यानंतर काही दिवसातच इराणने आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा केली. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेई यांची निवड करण्यात आली. मोजतबा खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा आहे.

दरम्यान आता मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल खळबळजनक माहिती समोर आली आहे. एक ऑडिओ रेकॉर्डिंग लीक झालं आहे. या ऑडियो रेकॉर्डिंगमधून ही माहिती समोर आली आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि इस्त्रायल इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली, त्यानंतर अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठा एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या काही नातेवाईकांचा मृत्यू झाला. दरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की, हा हल्ला झाला त्यापूर्वी अगदी काही मिनिटं आधीच मोजतबा खामेनेई हे घटनास्थळावरून बाहेर पडले होते. त्यामुळे ते थोडक्यात वाचले. अन्यथा त्या दिवशी मोजतबा खामेनेई यांचा देखील मृत्यू झाला असता अशी माहिती या लींक ऑडियो क्लिपमधून समोर येत आहे.

ब्रिटिश वृत्तपत्र द टेलीग्राफच्या एका रिपोर्टनुसार ही ऑडिओ क्लिप 12 मार्च रोजी झालेल्या वरिष्ठ इराणी धर्मगुरू आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड यांच्या संयुक्त बैठकीमधून लीक झाली आहे. जेव्हा अयतुल्ला अली खामेनेई यांच्यावर इस्त्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केला तेव्हा मोजतबा खामेनेई हे त्याच ठिकाणी होते, मात्र हल्ल्यापूर्वी अगदी काही सेंकद ते या बैठकीतून बाहेर पडले, त्यामुळे ते थोडक्यात वाचले आहे, अशी माहिती समोर येत आहे, या ऑडिओ क्लिपने इराणमध्ये खळबळ उडाली आहे.

Follow Us