…म्हणून दारुचं व्यसन वाईट, 10 रुपये कमी पडले, गड्यानं दुकान पेटवून मालकालाही पेटवलं…

| Updated on: Oct 23, 2022 | 9:56 PM

दारु घेताना 10 कमी पडले म्हणून दुकानदाराने बाटली दिली नाही, त्यामुळे रागाच्या भरात दुकानही आणि मालकाही पेटवले.

...म्हणून दारुचं व्यसन वाईट, 10 रुपये कमी पडले, गड्यानं दुकान पेटवून मालकालाही पेटवलं...
Follow us on

नवी दिल्लीः दारूचे व्यसन (Addiction to alcohol) सगळ्यात वाईट म्हणतात, कारण त्याच्यामुळेच कौटुंबिक हिंसाचार (Domestic violence) आणि कुटुंबातील कलहही वाढत असतोच. पण काहीवेळा माणसं एकमेकांना मारण्याच्या बेतातही असतात. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात मद्यधुंद तरुणाने दारु घेताना 10 रुपये कमी पडले. त्यामुळे त्याला दारु काय मिळाली नाही त्यामुळे दारुच्या दुकानालाच त्याने आग लावली.

या आगीत दुकानदारही गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर दुकान पेटवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशमधील बारखेडामधील दौलतपूर रोडवर दारूचे दुकान आहे. राजीव नावाचा व्यक्ती तिथे दारु विक्रीचं काम करतो. शनिवारी सायंकाळी सात वाजता राजीव हा दुकानात बसला होता.

त्यावेळी बारखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आधकटा गावात राहणारा शिवा दारू घेण्यासाठी दुकानात आला होता. त्यावेळी शिवाने दारूसाठी फक्त 120 रुपये दिले, मात्र दारुच्या बाटलीची किंमत 130 रुपये होती.

पैसे कमी असल्यामुळे दुकानदार आणि शिवाचा वाद झाला.काही वेळानंतर हा वाद मिठवण्यातही आला.

त्यानंतर शिवा त्या दुकानातून निघूनही गेला. मात्र थोड्या वेळाने तो पुन्हा ज्यावेळी दुकानावर आला त्यावेळी त्याने बाटलीतून आणलेल पेट्रोल दुकानाच्या काही भागावर टाकले, आणि दुकानालाच थेट आग लावण्यात आली.

मात्र त्याचवेळी दारु विक्री करणारा राजीव आत दुकानात सापडला होता. त्याने आरडाओरड केल्यानंतर मात्र लोकांनी त्याला बाहेर काढले आणि शिवाला पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यातही दिले.