AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक कोटी महिलांना मिळणार प्रत्येकी एक एक लाख, उत्तर प्रदेशच्या सरकारने थेट..

राज्यात निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या निवडणुकीत थेट या योजनेचा मोठा फायदा झाला. आता उत्तर प्रदेश सरकारनेही याबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला. महिलांना तब्बल 1 लाख रूपये दिली जाणार आहेत.

एक कोटी महिलांना मिळणार प्रत्येकी एक एक लाख, उत्तर प्रदेशच्या सरकारने थेट..
Women Schemes
| Updated on: Sep 10, 2026 | 7:23 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा फायदा इतका जास्त झाला की, राज्यात थेट महायुतीचे सरकार आले. सरकारकडून प्रत्येकी दीड हजार रूपये महिलांच्या खात्यावर टाकली जातात. महिलांनी या योजनेसाठी महायुती सरकारला भरभरून मतदान केले. आता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत. यादरम्यानच उत्तर प्रदेश सरकारने मोठी घोषणा केली. एक कोटी महिलांना एक एक लाख रूपये दिली जाणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. ही अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागणार आहे. पहिला हप्ता 20 डिसेंबरला जारी केला जाईला. विशेष म्हणजे महिलांना विशेष क्रिडिट कार्ड दिले जाईल. ही योजना तीन वर्षांसाठी लागू केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद माैर्य यांनी म्हटले की, सरकार महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदी आणि सीएम योगी आदित्यनाथ सतत याकरिता काम करत आहेत. ग्राम विकास विभागाची महत्वाची बैठक झाली. करोडो महिलांना या योजनेचा फायदा देण्यासाठी काम सुरू आहे. एक कोटी दिदींना पहिला हप्ता 20 हजार दिला जाईल.

या पैशातून महिला छोट्या व्यवसायाला सुरूवात करू शकतात. हेच नाही तर महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात महिलांना 30 हजार दिले जातील. तिसरा टप्प्यात 50 हजार सरकारकडून दिली जातील. उपमुख्यमंत्र्‍यांच्या सूचनेनुसार, पात्र महिलांना योजनेचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे दिले जातील. हेच नाही तर योगी सरकारकडून मुलींना 50 हजार स्कूटी खरेदी करण्यासाठीही दिली जात आहेत.

सरकारने मागच्या बजेटमध्ये याबाबत घोषणा केली होती. कंपन्यांसोबत संपर्क साधला जाऊ शकतो. महिला व मुलींना आकर्षिक करण्यासाठी सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी अशाप्रकारच्या योजना आणल्या जात आहेत. या योजनेमुळे थेट निवडणुकीत फायदा होताना दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या योजना या सरकारकडून आणल्या जात आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा