Shiva Sharma Case : माझा तू वापर केलास आणि आता तुझं..शिवा-श्रद्धा मधील WhatsApp चॅट आले समोर, अनेक खासगी सिक्रेट ओपन

Shiva Sharma Case : बिझनेसमॅन शिवा शर्मा प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा उलगडा होण्याऐवजी अधिक गुंतागुंत वाढत चालली आहे. आता दोघांमधील WhatsApp चॅट समोर आलं आहे. श्रद्धाच्या फ्लॅटमध्ये सेक्स टॉइज, शक्तीवर्धक औषधं अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडलेल्या.

Shiva Sharma Case : माझा तू वापर केलास आणि आता तुझं..शिवा-श्रद्धा मधील WhatsApp चॅट आले समोर, अनेक खासगी सिक्रेट ओपन
Shiva Sharma Case
| Updated on: Oct 14, 2026 | 11:02 AM

तरुण उद्योजक शिवा शर्मा प्रकरणाची सगळ्या देशभरात चर्चा आहे. या प्रकरणाचा उलगडा होण्याऐवजी अधिक गुंतागुंत वाढत चालली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमझील अवध ग्रीन अपार्टमेंटच्या खाली शिवा शर्मा मृतावस्थेत आढळले होते. या हाय-प्रोफाइल प्रकरणात आता शिवा शर्मा आणि त्यांची लिव इन पार्टनर मॉडल श्रद्धा दुबे यांच्यातील कथित WhatsApp चॅट समोर आलं आहे. या चॅटमधून दोघांच्या नात्यात तणाव होता, श्रद्धाची नाराजी आणि शिवा मानसिक दृष्टया हैराण झालेला हे दिसून येतं. पोलिसांनी चॅटच्या या पुराव्याचा केस डायरीमध्ये समावेश केला आहे. फॉरेंसिकसाठी हे चॅट पाठवून दिलं आहे.

श्रद्धा दुबे आणि शिवा शर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याने त्यांच्यात वादावादी सुरु असल्याचं कथित चॅटमधून समोर आलय. या चॅटमध्ये शिवाच्या बदललेल्या वागण्यावर श्रद्धा दुबेने आपली नाराजी प्रगट केली आहे. आधी शिवा तू दिवसाला सारखा-सारखा फोन करायचास, मेसेज करायचास. माझा तू वापर केलास पण आता तुझ्या वागण्यात तो आपलेपणा दिसत नाही असा तिने प्रश्न केलाय. चॅट सुरु असताना श्रद्धाला इतका राग येतो की, ती शिवासाठी अपशब्द वापरते, त्याला शिव्या देते. इतकचं नाही, रागाच्या भरात ती शिवाला तुझ्यासोबत काहीतरी वाईट घडलं पाहिजे असा सुद्धा शाप देते.

Loading...

तुझा प्रॉब्लेम काय आहे?

श्रद्धाचे मनाला भिडणारे प्रश्न आणि रागाला उत्तर देताना शिवा शर्मा नातं वाचवण्याचा प्रयत्न करतो. शिवा चॅटमध्ये तिला सांगतोय की, माझ्या व्यवहारात काहीही बदल झालेला नाही तसचं तुझ्यावरच प्रेमही कमी झालेलं नाही. शिवा चर्चेमध्ये आपल्या काही खासगी आणि व्यावसायिक अडचणी तिला सांगतो. श्रद्धा त्याला विचारते की तुझा प्रॉब्लेम काय आहे?. तेव्हा शिवा परिस्थितीसमोर हतबल असल्याचे सांगतो. त्या चॅटमधून शिवा नेमका कोणत्या अडचणीत आहे, ते स्पष्ट होत नाही.

शिवाला ब्लॅकमेल करत होती

शिवाच्या मृत्यूसाठी त्याच्या आईने रंजना शर्मा यांनी श्रद्धाला जबाबदार ठरवलं आहे. श्रद्धा बडे नेते आणि अधिकाऱ्यांचं नाव घेऊन शिवाला ब्लॅकमेल करत होती. खोट्या प्रकरणात तुरुंगात पाठवायची धमकी द्यायची. आईच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मॉडल श्रद्धा दुबे, तिची बहिण रश्मी, ड्रायव्हर आदिलसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us