निळ्या ड्रमपेक्षा पण डेंजर, बायकोने 35 सेंटीमीटर पर्यंत नवऱ्याचं पोट फाडलं, आतड्या बॅगेत भरल्या आणि..
पत्नीने पतीची हत्या करुन मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. आता त्याहीपेक्षा भयानक प्रकरण समोर आलं आहे. घटनास्थळावरच दृश्य पाहून रुम मालकालाही प्रचंड धक्का बसला.

बायकोने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. पण आता त्याहीपेक्षा भयानक घटना समोर आली आहे. कुरुक्षेत्रच्या पिहोवा रोडवरील राज पॅलेस जवळ एका रुममध्ये भयानक हत्याकांड घडलं आहे. मृताचं नाव राजेश (40) असून तो उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचा निवासी आहे. पत्नी विमला देवीवर राजेशच्या हत्येचा आरोप आहे. तिने राजेशवर चाकूने अनेक वार केले. जवळपास 35 सेंटीमीटरपर्यंत राजेशचं पोट फाडलं. घटनास्थळावरच दृश्य पाहून रुम मालकालाही प्रचंड धक्का बसला. त्याने सांगितलं की, राजेश रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला. त्याच्या पोटातून आतड्या बाहेर आलेल्या. आरोपानुसार, विमला देवी राजेशच्या आतड्या बॅगेत भरत होती. त्याचवेळी रुम मालक तिथे पोहोचल्याने ती घाबरली. तिने गडबडीत घराच्या छतावरुन खाली उडी मारली. यामध्ये विमला देवी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राजेशच्या पोस्टमार्टममधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. धारदार शस्त्राने वार केल्यामुळे राजेशच्या पोटात खोलवर जखमा झाल्या होत्या. त्याचं पोट जवळपास 35 सेंटीमीटरपर्यंत फाडण्यात आलेलं. जखमा इतका गंभीर होत्या की, आतड्या शरीराबाहेर पडलेल्या. पोलीस आता पोस्टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर पुढील तपास करत आहेत.
घरभर सर्वत्र रक्ताचे डाग होते
खोली मालक रिंकूने दिलेल्या माहितीनुसार, राजेशने वर्षभरापूर्वी वरच्या मजल्यावरील रुम भाड्यावर घेतली होती. तो पत्नी विमला देवीसोबत तिथेच राहत होता. रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रिंकूने दोघांच्या आरडा-ओरड्याचा आवाज ऐकला. आवाज ऐकताच तो वरच्या मजल्याच्या दिशेने पळाला. राजेशची स्थिती पाहून रिंकूच्या पायाखालची जमीनच सरकली. राजेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडलेला होता. घरभर सर्वत्र रक्ताचे डाग होते.
छतावरुन खाली उडी मारली
मी खोलीच्या दिशेने जात होतो, त्यावेळी विमला मला राजेशच्या बाहेर आलेल्या आतड्या बॅगेत भरताना दिसली असं रिंकूने पोलिसांना सांगितलं. रुम मालकाला समोर बघून विमला घाबरली व छतावरुन खाली उडी मारली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. विमलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस तिचं स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न करत आहेत.