Vande Mataram : वंदे मातरम सुरू असताना उभं राहिलं नाही तर अटक होते का? किती वर्षांची शिक्षा होते? नवा कायदा काय सांगतो

वंदे मातरम सुरू असताना जर उभं राहिलं नाही तर किती वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते? पोलीस तुम्हाला अटक करू शकतात का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.

Vande Mataram : वंदे मातरम सुरू असताना उभं राहिलं नाही तर अटक होते का? किती वर्षांची शिक्षा होते? नवा कायदा काय सांगतो
Vande Mataram
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 4:11 PM

केंद्र सरकारकडून वंदे मातरम संदर्भात अद्यावत गाइडलाइन्स जारी करण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्सनुसार काही अधिकृत प्रसंगी वंदे मातरम सुरू असताना उभे राहणं अनिवार्य करण्यात आलं आहे. एका रिपोर्टनुसार सर्व राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशामधील सरकारला केंद्राकडून वंदे मातरम संदर्भातील नवा प्रोटोकॉल स्पष्ट करणारा संदेश पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता सहाजिकच अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की जर वंदे मातरम सुरू असताना उभं राहिलं नाही तर काय होईल? अशा वेळी तुम्हाला पोलीस अटक करतील का? तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो का? आणि समजा गुन्हा दाखल झाला तर काय शिक्षा होऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

नवा नियम कुठे-कुठे लागू?

केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार सरकारी कार्यालय, राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तसेच शाळेत वंदे मातरम सुरू असातना उभं राहणं अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रपती यांच्या उपस्थितीमध्ये एखादा कार्यक्रम असेल तर तिथे देखील वंदे मातरम सुरू असातना उभं राहाणं अनिर्वाय आहे. तीन मिनिटे आणि 10 सेकंद एवढा याचा कालावधी आहे. जर समजा एखाद्या चित्रपटगृहात वंदे मातरम सुरू असेल तर त्याठिकाणी उभं राहणं अनिर्वाय नाही. एखाद्या चित्रपटापूर्वी किंवा डॉक्यूमेंट्रीमध्ये जर वंदे मातरम सुरू असेल तर त्यावेळी उभं राहणं बंधनकारक नाही, तसेच तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

कायदा काय सांगतो?

यासंदर्भात आधीच कायद्यामध्ये तरतूद आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून अपमान करण्याचा प्रयत्न केला, किंवा वंदे मातरम सुरू असातना गायनामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात पोलीस कारवाई करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच या व्यक्तीने जाणूनबुजून अडथळा केला आहे, हे सिद्ध झाल्यास पोलीस या व्यक्तीला अटक देखील करतात. जाणूनबुजून अडथळा निर्माण करणं हा कायद्याने गुन्हा मानला जातो.