AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Tawde : नितीन नवीन यांनी विनोद तावडेंवर सोपवली सर्वात मोठी, चॅलेंजिंग जबाबदारी, सगळ्या देशाचं असेल लक्ष

Vinod Tawde : महाराष्ट्रातून येणाऱ्या विनोद तावडेंवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. गमी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Vinod Tawde : नितीन नवीन यांनी विनोद तावडेंवर सोपवली सर्वात मोठी, चॅलेंजिंग जबाबदारी, सगळ्या देशाचं असेल लक्ष
vinod tawde
| Updated on: Aug 18, 2026 | 12:42 PM
Share

भाजपने पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. काल भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. आगमी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने आगामी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निवडणुका असलेल्या राज्यांची जबाबदारी अनुभवी नेत्यांवर सोपवली आहे. विनोड तावडे यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रभारी बनवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत ईश्वरभाई पटेल यांना सह-प्रभारीची जबाबदारी दिली आहे. विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार आहेत. भाजपंसाठी सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा समावेश होतो. अशावेळी विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवणं खूप मोठी बाब आहे.

सतीश पुनिया यांना पंजाब विधानसभा निवडणूक प्रभारी बनवण्यात आलं आहे. पुनिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार आहेत. पंजाबमध्ये पक्षासमोर संघटना मजबूत करणं आणि निवडणुकीसाठी जनाधार वाढवण्याचं आव्हान आहे. तरुण चुग यांना गुजरात विधानसभा निवडणूक प्रभारी नियुक्त करण्यात आलं आहे. चुग राज्यसभा खासदारा आहेत. पक्ष संघटनेत याआधी सुद्धा त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गुजरात भाजपचा मजबूत बालेकिल्ला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश भाजपसाठी महत्वाचं आहे.

युवा आणि अनुभवी नेत्यांचं संतुलन

नितीन नबीन यांनी नव्या कार्यकारिणीत युवा आणि अनुभवी नेत्यांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या टीममध्ये माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय महासचिव बनवण्यात आलं आहे. आरएसएस नेत राम माधव यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं आहे. बीएल संतोष यांना संघटन महामंत्री पदावर कायम ठेवण्यात आलं आहे. मीडियाची जबाबदारी अनिल बलूनी यांच्याकडे असेल. सोशल मीडियाची कमान छत्तीसगडचे नरेश म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?