लिंबू 700, कोथिंबीर 350 रुपये किलो, भाजीपाला प्रचंड महागला, जेवणाची थाळी कधी स्वस्त होणार?

व्यापाऱ्यांच्या मते, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले असून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लिंबू 700, कोथिंबीर 350 रुपये किलो, भाजीपाला प्रचंड महागला, जेवणाची थाळी कधी स्वस्त होणार?
vegetables and fruits price
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 8:29 PM

सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांत भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात अनेक भाज्यांच्या किमती 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्या असून फळांच्या दरांनीही सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडवले आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत असून भाजीपाला आणि फळांच्या खरेदीवर मर्यादा आणण्याची वेळ आली आहे. राजधानी दिल्लीत तर पालेभाज्यांचा भाव चांगलाच वाढला आहे.

कांदा वाढला, किती रुपयांना विकला जातोय?

दररोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या बटाटा आणि कांद्याच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. हिरव्या भाज्यांचे दर तर जवळपास दीड ते दुप्पट झाले आहेत. दिल्लीतील बाजारपेठांमध्ये किरकोळ दरानुसार टोमॅटो 40 ते 60 रुपये किलो, तर कांदा 75 ते 80 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याचा दर 30 ते 40 रुपये किलोच्या आसपास होता.

12 किलो असलेला बटाटा…

आल्याचा दर सुमारे 240 रुपये किलो असून लसूण आणि इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात 12 रुपये किलो असलेला बटाटा किरकोळ बाजारात 20 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे 36 ते 45 रुपये किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात 75 ते 80 रुपये किलो मिळत आहे. टोमॅटोचा घाऊक दर 23 ते 25 रुपये असताना किरकोळ दर 40 ते 60 रुपये आहे. बीन्स, वांगी, कोबी आणि फ्लॉवरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

कोथिंबीर सुमारे 350 रुपये किलो

व्यापाऱ्यांच्या मते, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले असून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बाजारात लिंबाचा दर 500 ते 700 रुपये किलोपर्यंत पोहोचला असून कोथिंबीर सुमारे 350 रुपये किलो विकली जात आहे. पालक आणि मोहरीच्या पालेभाज्यांचे दरही 100 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. दरम्यान, आता ही महागाई आटोक्यात आणावी अशी मागणी केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us