बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..
सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्यासाठी आजकाल लोक काय करतील, याचा अजिबात भरोसा नाही. त्यातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 3400 Kiss कारच्या मालकाला थेट पोलिस ठाण्यात जाण्याची वेळ आली.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कधी काय करतील हे सांगणे कठीण आहे. फॉलोवर्स वाढवण्यासाठी काहीही करताना दिसत आहेत. त्यातच रस्त्यावर फिरणाऱ्या एका कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्काच बसला. काही लोकांच्या बाजूने ही कार गेली आणि तेही थक्क झाले. एका युवकाने चक्क किसिंग कार तयार केली. त्याने आपल्या कारवर 3400 Kiss घ्यायला लावल्या. कारच्या पुर्ण बॉडीवर किसच दिसत होत्या. तब्बल 3400 किस कारवर होत्या. रस्त्यावरून अशी कार जाताना पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र, रिल ट्रेंड पकडणे याला चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वालियरची आहे. या व्हिडीओला एका दिवसात 55 लाख व्यूज मिळाले.
व्हायरल व्हिडीओनंतर ग्वालियार पोलिसांनी ही कार जप्त केली. कार मालक आदित्य सिकरवार यांच्या माहितीनुसार, इंस्टाग्रामवर ट्रेंड सेट करण्यासाठी त्यांनी फॉलोवर्स वाढवण्यासाठी त्यांनी हे करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गर्लफ्रेंडने यात त्याची साथ दिली. कारच्या बॉडीवर लिपस्टिकच्या मदतीने साडेतीन ते चार तासात 3400 किस केल्या.
त्यानतर आदित्य थाटीपूर परिसरातून कार घेऊन निघाला आणि पूर्ण शहरात फिरला. ज्यानंतर रस्त्यावरील लोकांनी या कारकडे लक्ष दिले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेत थाटीपूर पोलिसांनी कारला जप्त केले. पोलिस अधिकारी अभिषेक रघुवंशी यांनी म्हटले की, दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्विफ्ट कारचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.
ज्यावर लिपस्टिकच्या माध्यमातून आपत्तीजनक मार्क्स तयार करण्यात आले होते. या कारच्या मालकाला 5500 दंड लावण्यात आला. कारवाईनंतर त्याने आपली चूक मान्य केली. रिल्समुळे आपण नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आपल्या लक्षात आले नसल्याचे आदित्य याने म्हटले. मात्र, सोशल मीडियावर या कारचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. विदेशातील ट्रेंड या युवकाने भारतात सेट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा थेट पोलिस ठाण्यात पोहोचावे लागले.