AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हळदीतील या गुणधर्मामुळे इंस्टाग्रामवरील तो ट्रेंड होतोय प्रचंड व्हायरल, अभ्यासकांनी सांगितलं त्यामागचं वैज्ञानिक कारण

The Property of Turmeric : इंस्टाग्रामवर सध्या हळदीच्या विविध रंगछटाचे प्रयोग ट्रेंडिंग आहेत. तुम्हाला वाटत असेल की इन्स्टाग्रामवर वैज्ञानिक प्रयोगाला लाईक्स मिळतात का? पण या पेजवरील एका रिलला 12 कोटीपर्यंत व्ह्यूज मिळालेले आहेत. काय आहे हा हळदीचा प्रयोग?

हळदीतील या गुणधर्मामुळे इंस्टाग्रामवरील तो ट्रेंड होतोय प्रचंड व्हायरल, अभ्यासकांनी सांगितलं त्यामागचं वैज्ञानिक कारण
हळदीचे ते प्रयोग व्हायरलImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 1:04 PM
Share

योगेश लोंढे/प्रतिनिधी, नांदेड : इंस्टाग्रामवर गेल्या काही दिवसापासून एक ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. मोबाईलची बॅटरी लावून त्यावर काचेचा पाण्याने भरलेला ग्लास ठेवून पाण्यात कोरडी हळद टाकली जाते त्यानंतर पाण्यात आकर्षक असं सुंदर दृश्य तयार होतं. यातील एका – एका रीलला 12 कोटींपेक्षा अधिक लोक बघत आहेत. यामागे शास्त्रीय कारणे नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मदन अंभोरे यांनी स्पष्ट केले आहेत. अशा प्रयोगांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत विज्ञानाविषयीची जागरुकता, रूची वाढत असल्याचे दिसून येते.

तुम्हाला माहिती आहे का?

हळदीत कर्क्युमिन घटक असतो त्यावर प्रकाश पडला की तो प्रकाश प्रवर्तित करतो, त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतात. कर्क्युमिन घटकाच पाण्यात विरघळण्याचे प्रमाण कमी आहे. अल्कोहोल मध्ये मिथेनाईल द्रवणामध्ये कोरडी हळद टाकून हा प्रयोग केला तर जास्त प्रकाशित होतो. ही जादू अनुभवण्यासाठी देशातील अनेक जण हा प्रयोग करतात. त्यात अबालवृद्धांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे इन्स्टाग्रामवरून केवळ टाईमापास रिल्स अथवा बिभत्स रिल्सचा ऊत असतो असे नाही तर इन्स्टावर अशा वैज्ञानिक प्रयोगाची पण चलती आहे हे समोर येते.

पाण्यापेक्षा हळदीतील कर्क्युमिन या घटकाची विरघळण्याची क्षमता अल्कोहोल मध्ये जास्त आहे. विज्ञानामध्ये अशा प्रकारचे प्रयोग सेल इमेजिंग साठी केला जातो, कॅन्सर मारण्याचे काम देखील कर्क्युमिन करत असतो, अशी माहिती या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मदन अंभोरे यांनी दिली. त्यांच्या या प्रयोगांमुळे अबालवृद्धात वैज्ञानिक प्रयोगाची गोडी निर्माण झाल्याचे या व्हायरल ट्रेंडमुळे दिसते. विज्ञानाकडे क्लिष्ट म्हणून पाहणारे सुद्धा हा प्रयोग करून पाहतात हीच त्यामागील खरी गंमत आहे.

विविध उपक्रमातून शिक्षण

या प्रयोग शाळेत वेगवेगळे इस्टिमेट आहेत. आता जो चालू आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे विज्ञान मंच आहे. 15000 पेक्षा अधिक शेतकर्‍यांचे माती परीक्षण आम्ही या प्रयोगशाळेतून करून दिल आहे. अशा ट्रेंडमुळे पुष्कळ शिकायला मिळते, अशी माहिती नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे यांनी दिली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.