Video : कॅन्सर पीडित चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टर आणि नर्सेसचा आनंद गगनात मावेना!

| Updated on: May 14, 2021 | 6:44 PM

कॅन्सर पीडित चिमुकल्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Video : कॅन्सर पीडित चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टर आणि नर्सेसचा आनंद गगनात मावेना!
वाराणसीतील डॉक्टरांचा चिमुकल्यासह डान्स
Follow us on

वाराणसी : देशभरात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण सरकार आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशावेळी वाराणसीमधून एक सकारात्मक बातमी समोर आलीय. वाराणसीच्या डॉ. होमी भाभा कॅन्सर रुग्णालयात भरती असलेल्या 3 वर्षाच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केलीय. रक्ताच्या कर्करोगाने ग्रासलेला हा चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. तेव्हा तो वाचेल का? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसच्या मेहनतीच्या जोरावर 3 वर्षाच्या चिमुकल्याने बल्ड कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातही कोरोनावर मात केलीय. (A child with cancer overcomes the corona Dance video of doctors goes viral)

या चिमुकल्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रुग्णालयाच्या वॉर्डात पीपीई किट घातलेले डॉक्टर आणि नर्स आनंदाने नाचताना दिसले. डॉक्टर आणि नर्सेससोबत हा चिमुकला आणि अन्य रुग्णही टाळ्या वाजवताना दिसत आहेत. कॅन्सर पीडित या चिमुकल्याने कोरोनावर मात केल्यानंतर आनंदाने नाचतानाचा डॉक्टर आणि नर्सेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, या चिमुकल्यासोबत त्याची आईदेखील कोरोना पॉझिटिव्ह होती. मुलाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ‘जीत जायेगा इंडिया…’ या गाण्याच्या तालावर डॉक्टर, नर्स यांच्यासह अन्य रुग्णही थिरकले.

डॉ. दीपशिखा घोष यांचा हृदयद्रावक अनुभव

डॉ. दीपशिखा घोष यांनी आपल्याला आलेला अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. “माझ्या शिफ्टच्या अखेरीस मी मृत्यूशय्येवर असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल केला. आमच्या हॉस्पिटलमध्ये मी सहसा अशा गोष्टी करते, जेव्हा एखाद्या रुग्णाची किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असते. या रुग्णाच्या मुलाने माझा काही वेळ मागितला. त्यानंतर त्याने आपल्या मरणासन्न अवस्थेतील आईसाठी गाणे गायले” असे डॉ. दीपशिखा घोष यांनी लिहिले आहे.

‘तेरा मुझसे है पेहले का नाता कोई’

“त्या तरुणाने ‘तेरा मुझसे है पेहले का नाता कोई’ हे गाणं गायलं. मी तिथे फोन धरुन स्तब्ध उभे होते. त्याच्याकडे पहात होते, त्याच्या आईकडे पाहत होते आणि त्याचं गाणं ऐकत होते. माझ्या बाजूला काही नर्स येऊन शांतपणे उभ्या राहिल्या. तो गाता-गाता मध्येच रडू लागला, परंतु त्याने गाणं पूर्ण केलं. त्याने आईची खुशाली विचारली, माझे आभार मानले आणि फोन ठेवून दिला.” असं पुढे डॉक्टरांनी लिहिलं आहे.

संबंधित बातम्या :

Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार, कोविशील्ड, कोव्हॅक्सिनसह अन्य कोणत्या लस मिळणार?

A child with cancer overcomes the corona Dance video of doctors goes viral