Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार

गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 43 हजार 144 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे (New Corona Cases India)

Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार
कोरोना व्हायरस
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 9:51 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. कालच्या दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 19 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 43 हजार 144 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती, मात्र आजच्या दिवसात काहीसा दिलासा मिळाला आहे. (New 343144 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या आठवड्यात 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 43 हजार 144 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 44 हजार 776 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 62 हजार 317 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 2 कोटी79 हजार 599 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 4 हजार 893 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 72 लाख 14 हजार 256 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 3,43,144

देशात 24 तासात डिस्चार्ज –3,44,776

देशात 24 तासात मृत्यू – 4,000

एकूण रूग्ण – 2,40,46,809

एकूण डिस्चार्ज – 2,00,79,599

एकूण मृत्यू – 2,62,317

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 37,04,893

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 17,92,98,584 (New Corona Cases India)

India reports 3,43,144 new #COVID19 cases, 3,44,776 discharges and 4,000 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 2,40,46,809 Total discharges: 2,00,79,599 Death toll: 2,62,317

Active cases: 37,04,893

Total vaccination: 17,92,98,584 pic.twitter.com/rLz1Fvz1Oa

— ANI (@ANI) May 14, 2021

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना दिलासा, दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट, रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार, कोविशील्ड, कोव्हॅक्सिनसह अन्य कोणत्या लस मिळणार?

(New 343144 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.