Video : पत्रकारांनी शुभेंदू अधिकारींबद्दल प्रश्न विचारला आणि ममता म्हणाल्या, प्रेस कॉन्फरन्स आता संपली!, बघा काय काय घडलं?

| Updated on: Jun 11, 2021 | 8:21 PM

मुकुल रॉय यांच्या पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने शुभेंदु अधिकारी यांचं नाव घेताच ममता बॅनर्जी भडकल्या आणि त्यांनी अर्ध्यातच पत्रकार परिषद संपल्याचं जाहीर केलं.

Video : पत्रकारांनी शुभेंदू अधिकारींबद्दल प्रश्न विचारला आणि ममता म्हणाल्या, प्रेस कॉन्फरन्स आता संपली!, बघा काय काय घडलं?
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले मुकुल रॉय यांनी आज घरवापसी केली आहे. मुकुल रॉय यांच्यासह त्याचा मुलगा शुभ्रांशु रॉय यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. दरम्यान, रॉय यांच्या पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने शुभेंदु अधिकारी यांचं नाव घेताच ममता बॅनर्जी भडकल्या आणि त्यांनी अर्ध्यातच पत्रकार परिषद संपल्याचं जाहीर केलं. (Mamata Banerjee got angry when reporters asked about Shubhendu Adhikari)

मुकुल रॉय यांच्या प्रवेशानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी मुकुल रॉय यांच्यासह भाजपमध्ये गेलेले अन्य नेतेही घरवापसी करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अनेक नेते पुन्हा टीएमसीमध्ये दाखल होतील त्यात अनेक मोठ्या नेत्यांचाही समावेश असेल असा दावा ममता यांनी केलाय. त्यावेळी मुकुल रॉय यांनाही पत्रकारांनी तुमच्यासोबत अन्य नेतेही घरवापसी करणार का? असा सवाल केला. त्यावेळी पुढील काही दिवसांत अनेक नेते पुन्हा तृणमूलमध्ये परत येतील असं त्यांनी सांगितलं. पत्रकाराने शुभेंदु अधिकारी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी अचानक उठून पत्रकार परिषद संपल्याची घोषणा केलीय.

ममतांचा भाजपवर हल्लाबोल

भाजप हा लोकशाहीवादी पक्ष नाही. तो जमिनदारांचा पक्ष आहे. मी भाजप मीडियाला संतुष्ट करु शकत नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर मुकुल रॉय आले, अन्य नेतेही परत येतील. त्या-त्या वेळी तुम्हाला माहिती दिली जाईल, असंही ममता यांनी सांगितलं. मुकुल रॉय कुठली जबाबदारी दिली जाईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही, असं ममता म्हणाल्या.

भाजपमध्ये मान नव्हता

मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर टीएमसीतील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल रॉय यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

‘घर का लडका घर वापस आया’; मुकुल रॉय यांच्या टीएमसी प्रवेशानंतर ममतादीदींचं विधान

West Bengal: ममतादीदींचा पुन्हा ‘खेला’, मुकुल रॉय यांची घरवापसी?; भाजपला मोठा झटका

Mamata Banerjee got angry when reporters asked about Shubhendu Adhikari