West Bengal: ममतादीदींचा पुन्हा ‘खेला’, मुकुल रॉय यांची घरवापसी?; भाजपला मोठा झटका

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचंड यश मिळवत सत्ता राखली आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसी करण्यास सुरुवात केली आहे.

West Bengal: ममतादीदींचा पुन्हा 'खेला', मुकुल रॉय यांची घरवापसी?; भाजपला मोठा झटका
Mukul Roy
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 2:34 PM

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचंड यश मिळवत सत्ता राखली आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसी करण्यास सुरुवात केली आहे. टीएमसीमधून भाजपमध्ये गेलेले भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय हे पुन्हा टीएमसीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारीच ते ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Buzz on bjp leader Mukul Roy returning to TMC)

आज दुपारी टीएमसीची संघटनात्मक बैठक होणार आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांच्यासह टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. टीएमसीला सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना पक्षात पुन्हा घेण्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुकुल रॉयही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्या तीन घडामोडी

निवडणूक झाल्यानंतर कोलकातामध्ये भाजपची बैठक झाली होती. या बैठकीला मुकुल रॉय उपस्थित राहिले नव्हते. त्याचवेळी टीएमसीचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी दवाखाण्यात जाऊन मुकुल रॉय यांच्या पत्नीची विचारपूस केली होती. या दोन्ही घटनांमुळे मुकुल रॉय टीएमसीमध्ये परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणावर नंतर बोलू. काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान मुकुल रॉय यांच्या मुलाने या भेटीनंतर केलं होंत. त्यामुळे रॉय हे भाजप सोडणार असल्याच्या शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

पक्षात मान नव्हता

मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर टीएमसीतील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल रॉय यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते, असं सांगितलं जात आहे. (Buzz on bjp leader Mukul Roy returning to TMC)

संबंधित बातम्या:

West Bengal result 2021 : ममता बॅनर्जींनी मोदींविरोधात रणशिंग फुंकलं! 2024 साठी एकजूट व्हा, विरोधी पक्षांना आवाहन

West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शुन्यावर!

बंगाली मतदारांनी आयाराम गयारामांना नाकारलं, तीन खासदारही पराभूत; देशाचं राजकारण बदलतंय?

(Buzz on bjp leader Mukul Roy returning to TMC)

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....