Delimitation Bill : तर महाराष्ट्रातही मोठी उलथापालथ, पवार गटाने NDA ला पाठिंबा देताच…नेमकं काय घडणार?
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या अनुषंगाने पवार गटाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचाही अर्थ त्यातून निघू शकतो. जोपर्यंत विधेयक संसदेत येत नाही, मतदानाला येत नाहीत तोपर्यंत पवार गटाची भूमिका स्पष्ट होत नाही असं बोलता येत होतं, असं मत विजय चोरमारे यांनी व्यक्त केलंय.

Delimitation Bill : देशाच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या धोरणावर विरोध करणारा शरद पवार यांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. पडद्यामागे तशा हालचाली सुरू आहेत. आज (28 नोव्हेंबर) इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे जाणार नाहीत. सुप्रिया सुळे यांच्याऐवजी खासदार निलेश लंके आणि अमोल कोल्हे या बैठकीला जाणार आहेत, असं सांगितलं जात होतं. परंतु आता पवार गटाचा एकही प्रतिनिधी या बैठकीला जाणार नसल्याचे बोलले जातेय. याच कारणामुळे इंडिया आघाडीत मोटी फूट पडली आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. एकंदरीत सगळीकडेच अनिश्चितता निर्माण झाली आहे. यावरच आता राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी भाष्य केलंय. त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या असून मतदारसंघ पूनर्रचना विधेयकाच्या अनुषंगाने पवार गटाने एनडीएला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्राचेही राजकारण बदलू शकते, असं महत्त्वाचं भाकित त्यांनी केलंय.
आजच्या बैठकीला सुप्रिया सुळे जाणार नसून खासदार निलेश लंके या बैठकीला जातील, अशी माहिती होती. परंतु आता नवी माहिती मिळत आहे. शरद पवार गटाचे खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नसतील तर हे गंभीर आहे. याचा अर्थ हा शरद पवार गट इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु आपल्याला वाट पाहावी लागेल. दुपारी इंडिया आघाडीची बैठक आहे, असं मत विजय चोरमारे यांनी व्यक्त केलंय.
सोबतच, इंडिया आघाडीला शरद पवार यांच्या पक्षाला कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसेल तर यातून काही बाबी स्पष्ट होतात. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या अनुषंगाने पवार गटाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचाही अर्थ त्यातून निघू शकतो. जोपर्यंत विधेयक संसदेत येत नाही, मतदानाला येत नाहीत तोपर्यंत पवार गटाची भूमिका स्पष्ट होत नाही असं बोलता येत होतं. परंतु ते इंडिया आघाडीच्या बैठकीलाच न गेल्यास त्यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असा त्याचा अर्थ निघू शकतो, असं मोठं विधान त्यांनी केलं.
आपल्याला इंडिया आघाडीच्या बैठकीपर्यंत वाट पाहावी लागेल. पवार गटाकडून काय स्पष्टीकरण येतं ते पाहावं लागेल. या विधेयकाला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली तर तो पक्ष इंडिया आघाडीतून आपोआप बाहेर पडेल, असा त्याचा अर्थ निघतो का हेही पाहावे लागेल. पवार गटाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होऊ शकतो. पवार गट केंद्रात आणि राज्यातील सत्तेत सहभागी होणार का? हेही पाहावे लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीत काय होते, ते पाहणे गरजेचे आहे. इंडिया आघाडीतील फूट टाळण्यासाठी काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील इतर नेते काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.