Violence in Delhi : हनुमान जयंतीदिनी दिल्लीत हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक आणि तुफान राडा; केजरीवालांचं शांततेचं आवाहन

| Updated on: Apr 16, 2022 | 11:12 PM

सध्या जहांगीर पुरी आणि परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. हिंसाचार झालेल्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

Violence in Delhi : हनुमान जयंतीदिनी दिल्लीत हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक आणि तुफान राडा; केजरीवालांचं शांततेचं आवाहन
दिल्लीतील हिंसाचारानंतर अरविंद केजरीवाल यांचं शांततेचं आवाहन
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : देशात सर्वत्र हनुमान जयंती साजरी होत असताना राजधानी दिल्लीत मात्र मोठा हिंसाचार (Violence in Delhi) पाहायला मिळाला. दिल्लीच्या जहांगीर पुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) आयोजित शोभायात्रेवेळी दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळफोळ करण्यात आली. जमावाकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार सध्या जहांगीर पुरी आणि परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. हिंसाचार झालेल्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

अरविंद केजरीवालांचं शांततेचं आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीत जहांगीर पुरी भागात शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीचा मी निषेध करतो. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. मी सर्वांता शांतता राखण्याचं आवाहन करतो. त्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय. तसंच दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असंही ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचीही पोलीस आयुक्तांशी चर्चा

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जहांगीर पुरी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी चर्चा केली. शाह यांनी पोलीस आयुक्तांना कायदा आणि सुव्यस्था कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीत मोठा हिंसाचार

भाजप नेत्यांकडून षडयंत्राचा आरोप

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह भाजप नेत्यांकडूनही शांततेचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, काही भाजप नेत्यांनी जहांगीर पुरीमधील हिंसाचार हा योगायोग नसल्याचं म्हटलंय. या हिंसाचाराकडे दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पाहिलं जावं. दिल्लीमध्ये दंगल घडवून आणण्याचा कट आहे. हनुमान जयंतीच्या उत्सवात मग्न असलेल्या रामभक्तांवर कट रचून हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केलाय.

इतर बातम्या :

Hanuman Jayanti Delhi : हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवेळी दिल्लीत मोठा राडा, अनेक गाड्यांची तोडफोड, पोलीसही जखमी

13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जातीय हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली, पंतप्रधान मोदींच्या ‘मौन’वर प्रश्नचिन्ह