वक्फ कायद्याविरोधात प. बंगालमध्ये हिंसक निदर्शने, पोलिसांची वाहने पेटविली, मुर्शिदाबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग बंद

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ अजूनही बंद असून आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु निदर्शने करणाऱ्यांचा राग शांत झालेला नाही. जोरदार तोडफोड सुरु असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

वक्फ कायद्याविरोधात प. बंगालमध्ये हिंसक निदर्शने, पोलिसांची वाहने पेटविली, मुर्शिदाबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग बंद
| Updated on: Apr 08, 2025 | 6:58 PM

वक्फ दुरुस्ती कायदा विधेयकावरुन पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज पोलीस ठाणे हद्दीत उमरपुर – बानीपुर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ वर चक्का जाम केला आहे. यावेळी जमावाने पोलिसांच्या दोन वाहनांना आग लावली आहे.यामुळे या परिसरात तणाव पसरला असून पोलिसांनी लाठीमार केला आहे.

येथे पोस्ट पाहा –


वक्फ कायद्याचा विरोध करण्यासाठी निर्दशने सुरु होती. हा कायदा सरकारने मागे घ्यावा अशी मागणी निदर्शक करीत होते.जेव्हा पोलिसांना हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा निदर्शकांनी संतापाने पोलिसांच्या अंगावर विटांचा मारा केला. तसेत रस्त्यांवर चक्का जाम केला. त्यानंतर निदर्शकांना रस्त्यांवरील पोलिसांच्या दोन वाहनांना पेटवले. ज्यामुळे याक्षेत्रात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

येथे पोस्ट पाहा –

मुर्शीदाबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १२ अजूनही बंद आहे. निदर्शकांना आवरण्यासाठी अतिरिक्त फोजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू निदर्शने करणाऱ्यांचा राग शांत होण्याचे नाव घेत नसल्याने जोरदार तोडफोड सत्र सुरु असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

वक्फ विधेयक आता कायदा झाला आहे

खरंतर वक्फ दुरुस्ती विधेयक आता संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झाले आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही झाल्याने त्याने आता कायद्याचे रूप धारण केले आहे. मुस्लीम समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मालमत्तेचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुधारणा आणण्यासाठी वक्फ बिलात सुधारणा केल्या आहेत. वक्फ ही एक इस्लामिक संस्था असून त्यात एखादी मालमत्ता धर्मादाय कारणांसाठी दान केली जाते आणि त्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न मुसलमानाच्या सामाजिक सेवा, शिक्षण आणि इतर धार्मिक कार्यांसाठी वापरले जाते.परंतू याचा उद्देश्य मुस्लीमांच्या शिक्षणासाठी किंवा इतर विकासासाठी होत नव्हता असा सरकारचा आक्षेप होता. त्यामुळे वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करणाऱ्या या वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सरकारने आणले होते.