सापांना घरापासून दूर ठेवायचंय? मग घराच्या परिसरात हे झाड लावाच, आयुष्यात पुन्हा कधी साप दिसणार नाही

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, आता लवकरच पावसाळा देखील सुरू होईल. उन्हाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतू असे असतात की ज्या ऋतुंमध्ये साप आपल्या बिळाबाहेर येतात. अशावेळी ते तुमच्या घरात शिरण्याचा देखील धोका असतो, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते.

सापांना घरापासून दूर ठेवायचंय? मग घराच्या परिसरात हे झाड लावाच, आयुष्यात पुन्हा कधी साप दिसणार नाही
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 27, 2026 | 7:34 PM

उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतु असे असतात की या दोन्ही ऋतुंमध्ये भारतात संर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यात भारतासारख्या देशात प्रचंड उन असतं. उन्हाळ्यात तापमान अगदी 45 अशं सेल्सिअसपर्यंत देखील पोहोचतं. अशा स्थितीमध्ये जमीन प्रचंड तापते, साप हा मुळातच थंड रक्ताचा प्राणी आहे, त्यामुळे तापमानात झालेला बदल तो सहन करू शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात साप बिळाच्या बाहेर पडतात. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरल्याने ते बिळाच्या बाहेर पडतात. पावसाळ्यात अनेकदा असं देखील होतं की जर पाऊस जोरदार झाला तर मातीमुळे सापांची बिळं बुजली जातात, त्यांना लपण्यासाठी दुसरी जागा नसते, त्यामुळे अशा स्थितीमध्ये ते त्यांचा मोर्चा तुमच्या घराकडे वळवतात. त्यामुळे पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते.

साप पावसाळ्यात नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या जागेच्या शोधात असतो, तर उन्हाळ्यामध्ये थंड आणि अंधाऱ्या जागेच्या शोधात असतो. अशी जागा अनेकदा त्याला तुमच्या घरात मिळू शकते, त्यामुळे या दोन्ही ऋतुंमध्ये घरात साप घुसण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुठेही अशाप्रकारे साप आढळला तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या, ते त्याला रेस्क्यू करून सुरक्षित जागी सोडतील. साप हा स्वत:हून कधीच कोणावर हल्ला करत नाही, मात्र तुम्ही त्याची शिकार आहात, किंवा तुमच्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे असा त्याचा समज झाला तर तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. त्यामुळे सतर्क राहणं महत्त्वाचं असतं.

जर तुमच्याही घरात वारंवार साप घुसण्याच्या घटना घडत असतील तर अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या घराच्या परिसरात एक चार ते पाच बोरीच्या झाडांची झुडपं लावू शकतात. बोरीच्या झाडाला काटे असतात. साप हा सरपटणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला या बोरीच्या काट्यांचा त्रास होतो. त्यामुळे ज्या परिसरात बोरीची झुडपं आहेत, अशा परिसरात साप कधीही येत नाही, आजही अनेकदा जे लोक जंगल परिसरात राहतात, ते आपलं सापांपासून संरक्षण व्हावं म्हणून ही झाडं आवर्जून घराशेजारी लावतात. ज्या परिसरात ही झाडं असतात, त्या परिसरात साप शक्यतो येत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us