Yogi Adityanath : ‘त्यांचं आम्ही राम नाम सत्य सुद्धा करतो’, योगी आदित्यनाथ यांचं मोठ विधान

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कठोर प्रशासक म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रचार करताना एक मोठ विधान केलय. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत.

Yogi Adityanath : 'त्यांचं आम्ही राम नाम सत्य सुद्धा करतो', योगी आदित्यनाथ यांचं मोठ विधान
cm yogi adityanathImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 10:50 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लोकसभा निवडणूक 2024 साठी जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी ते जनतेला आवाहन करतायत. प्रचारामध्ये ते आपल्या सरकारने केलेल्या कामांची उदाहरण देतायत. प्रशासन किती मजबूत आहे? ते सांगतात. ते अलीगढमध्ये बोलत होते. त्यावेळी सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की, “कोणी विचार केलेला की, मुलगी आणि व्यापारी रात्री सुरक्षित बाहेर पडू शकतात. आम्ही फक्त रामच आणत नाही, तर मुलगी आणि व्यापारी यांच्या सुरक्षेला जो धोका बनतो, त्याच राम नाम सत्य सुद्धा करतो” “जर एखादा व्यक्ती समाजाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असेल, तर त्याच राम नाम सत्य निश्चित आहे. 10 वर्षापूर्वी जे स्वप्न होतं, ते आता प्रत्यक्षात आलय. तुमच्या एका मतामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकलं” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“एक मत चुकीच्या लोकांना गेल्यामुळे देश भ्रष्टाचार, अराजकता आणि उपद्रव यामध्ये बुडून जायचा. कर्फ्यू लागायचा. गुंडगिरी वाढायची. मत आपलं, त्यामुळे पापामध्ये आपण सुद्धा भागीदार असणार. जेव्हा चुकीच्या लोकांना तुम्ही मत देणार, तेव्हा असं होणार” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

मोदींच्या गॅरेंटीने तुमच भविष्य बनेल

सीएम योगी म्हणाले की, “म्हणून म्हणतोय की, तुम्ही तुमच एक मत पीएम मोदींना दिलं, मोदींच्या नावावर दिलं, तर मोदींच्या गॅरेंटीने तुमच भविष्य बनेल. तुम्ही पाहा वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर हायवे, रेल्वे, एअरपोर्टच निर्माण कार्य सुरु आहे. डिफेंस कॉरिडोर, गुंतवणूक, मेडिकल कॉलेज, विश्वविद्यालय, फॅक्टरीच निर्माण कार्य चालू आहे”

योगी आदित्यनाथ यांची ही कितवी टर्म?

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची योगी आदित्यनाथ यांची ही दुसरी टर्म आहे. देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत. उत्तर प्रदेशातून लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा केंद्रात सत्ता बनवण्याचा मार्ग सुकर होतो.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.