
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानात दाणादाण उडवल्याने भारतीय सैन्याच्या ताकदीचा अंदाज आल्याने पाक नरमला आहे. आता एका एअर डिफेन्स सैन्य अधिकाऱ्याने मोठे वक्तव्य केले आहे. हा अधिकारी म्हणाला की संपूर्ण पाकिस्तान आमची सीमा आहे. आम्ही एका आदेशाची वाट पाहात आहोत. जेव्हा पाहीजे तेव्हा आम्ही पाकिस्तान सैन्याचे हेडक्वॉर्टर नष्ट करु शकतो. काय केले नेमके वक्तव्य…वाचा
भारतीय सैन्याचे वायू संरक्षण महासंचालक लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी सोमवारी भारतीय सैन्याच्या क्षमतेसंदर्भात जे वक्तव्य केले आहे, त्यानंतर पाकिस्तानात हडकंप माजला आहे. कुन्हा यांनी खूपच स्पष्ट शब्दात सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय वायू सेनेने मोठा हल्ला केला आणि अजूनही सर्व पर्याय खुले ठेवलेले आहेत. भारताकडे शस्रास्र भंडार मोठे आहे. जे पाकिस्तानच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करु शकतात. न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल डी. कुन्हा यांनी भारतीय सैन्य क्षमतेवर मोठे भाष्य केले आहे.
येथे पोस्ट आहे –
#WATCH | Delhi: DG Army Air Defence Lt Gen Sumer Ivan D’Cunha says, “India has an adequate arsenal of weapons to take on Pakistan right across its depth. So, from its broadest to its narrowest, wherever it is, the whole of Pakistan is within range… The GHQ (General… pic.twitter.com/U8jFcmIC8Y
— ANI (@ANI) May 19, 2025
पाकिस्तानी सैन्याचे जनरल हेडक्वार्टर (जीएचक्यू) रावलपिंडीतून खैबर पख्तुनख्वा( केपीके) वा अन्य कुठेही शिफ्ट करो. तरी त्यांना खोल खड्डा शोधावा लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत इतके अचूक हल्ले आम्ही केले आहेत. त्यात पाकिस्तानचे हवाईतळ बर्बाद झाले आहेत.यात लॉइटरिंग मुनिशन्सचा ( बराच काळ हवेत असणारे हत्यार ) वापर करुन उच्च क्षमतेच्या लक्ष्यांना नष्ट केले आहे.यात स्वदेशी क्षमतेचे लांबपल्ल्याचे ड्रोन आणि गायडेट मुनिशन्सने ऑपरेशन्सने या ऑपरेशन सिंदुरमध्ये यशस्वी भूमिका निभावली आहे.
मी आता एवढंच सांगू शकतो. भारताच्याजवळ पाकिस्तानचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी पर्याप्त हत्यारं आहेत. सर्वात रुंद भाग असो किंवा सर्वात अरुंद भाग आहे. संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये आहे. आम्ही आपल्या सीमेपासून खोलपर्यंत संपूर्ण पाकिस्तानला निशाणा बनवू शकतो. जीएचक्यू रावलपिंडीपासून केपीके वा कुठेही घेऊन जाऊ शकते. परंतू ते आमच्या रेंज आहे.त्यांना खरोखरच मोठा खड्डा शोधावा लागेल असे लेफ्टनंट जनरल डी. कुन्हा यांनी सांगितले.
सैन्याचे प्राथमिक कर्तव्य देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकांचे रक्षण करणे आहे असे सांगतानाच लेफ्टनंट जनरल डी. कुन्हा म्हणाले,की “आमचे काम आपल्या सार्वभौमत्वाचे आणि लोकांचे रक्षण करणे आहे. आम्ही आमच्या मातृभूमीला या हल्ल्यापासून वाचवले, हा हल्ला रहिवासी भागात आणि आमच्या लष्करी छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी होता. कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची संपूर्ण दक्षता आम्ही घेतली.त्यामुळे केवळ आमच्या नागरिकांनाच नाही तर आमचे सैनिक, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनाही अभिमान वाटला. ही भारतातील लोकांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे असेही ते म्हणाले.