
जयपूर येथे एक विवाह सोहळा सुरू होता. नवरदेव आणि नवरी एका पाटावर पूजा विधी करण्यात गुंतले होते. त्यावेळी एक अशी घटना घडली की, त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकंच काय तर नवरदेव सुद्धा आश्चर्याने हा सर्व प्रकार पाहत होता. जयपूर येथे विनायक शर्मा आणि सिद्धि शर्मा यांचे लग्न होते. त्यावेळी नवरदेवाने नवरीच्या भांगेत कुंकू लावले. त्याला सिंदूर प्रथा म्हणतात. ती झाली. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईक दोघांना आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले. तेव्हाच एक कबुतर अचानक आले आणि ते नवरीच्या डोक्यावर बसले. ते पाहुन सर्वच आश्चर्याने पाहू लागले. याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
वधूच्या डोक्यावर येऊन बसले कबुतर
जयपूर येथील या विवाह सोहळ्यात ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. विनायक आणि सिद्धी यांचा लग्न सोहळा रंगला होता. विनायकने सिद्धीच्या भांगेत कुंकू लावले. मग सर्वजण या दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले. तेव्हा अचानक एक कबूतर आले आणि ते सिद्धीच्या डोक्यावर बसले. नवदाम्पत्याला एखाद्या पूर्वजाने आशीर्वाद दिला अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. सिद्धी पण या घटनेने आनंदून गेली. तर विनायक तिच्याकडे आश्चर्याने पाहत असल्याचे दिसून आले.
सिद्धीचा आनंद गगनात मावेना
30 एप्रिल 2025 रोजी हे लग्न जयपूर येथे थाटामाटात लागले. भल्या पहाटेच मुहूर्त साधण्यात आला. सकाळी 5 वाजता लग्नातील काही विधी सुरू होते. विनायकने सिद्धीच्या भांगेत कुंकू लावले. त्यानंतर ते दोघे पुढील पूजा करणार होते. नातेवाईक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उठले. तेव्हा हे कबूतर उडत आले आणि सिद्धीच्या डोक्यावर बसले. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले. सिद्धी या प्रकाराने भांबावून गेली नाही. तिला आनंद झाला. तिने त्याला हटवण्याचा प्रयत्न ही केला नाही. हे कबूतर थोडा वेळ तिच्या डोक्यावर बसले. त्यानंतर ते उडून गेले. नंतर सिद्धी सह सर्वच मंडळींनी हा शुभ शकून असल्याचे मानले.
या घटनेनंतर दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांमध्ये चर्चा झाली. दोघांच्या मते ही काही साधारण घटना नाही. कारण जिथे लग्न सुरू होते. तिथे कबूतर दिसले नाही. पण विधी सुरू असतानाच न डगमगता, न घाबरता हे कबूतर उडून सिद्धीच्या डोक्यावर बसले. त्यांच्या मते घरातील एखादा पूर्वजच आशीर्वाद देण्यासाठी आला होता. तर विनायक आणि सिद्धीच्या मते, ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुर्लभ घटना आहे. ही एक मोठी आठवण आहे. दोघांच्या सूखी दाम्पत्य जीवनासाठी हे चांगले संकेत असल्याचे त्यांना वाटते.