Wedding season 2026: विवाहाचा सिझन सुरु, 52 लाख विवाहातून 7.5 लाख कोटींचा व्यवसाय होणार, व्यापाऱ्यांच्या संघटनेचा दावा

विवाहाचा सिझन आता सुरु होत असून लग्नाचे मुहूर्त असल्याने तब्बल 52 लाख विवाहातून 7.5 लाख कोटींचा व्यवसाय होणार असल्याचा अंदाज व्यापारी संघटनांनी वर्तवला आहे.

Wedding season 2026: विवाहाचा सिझन सुरु, 52 लाख विवाहातून 7.5 लाख कोटींचा व्यवसाय होणार, व्यापाऱ्यांच्या संघटनेचा दावा
wedding season 2026
| Updated on: Nov 20, 2026 | 8:27 PM

विवाहाचा सिझन आता सुरु होणार आहे. कारण लग्नाचे मुहूर्त आता  सुरु होत आहेत. येत्या २१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात देशात तब्बल ५२ लाख विवाह लागण्याची शक्यता आहे. यामुळे विवाहाशी संबंधित बाजारात ७.५ लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची आशा व्यक्त होत आहे. देशभरात या लग्नासंबंधीच्या व्यवसायाचे भाकीत व्यापाऱ्यांची संघटना ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ( कॅट ) केले आहे.

दरदिवशी सुमारे दोन लाख विवाह

Loading...

अखिल भारतीय व्यापारी परिसंघ ( कॅट ) च्या मते २५ दिवसांपासून या सिझनच्या दरम्यान दर दिवशी सरासरी दोन लाख विवाह होण्याची आशा आहे.यामुळे बाजारात मोठी उलाढा होण्याची आशा आहे. लग्नाशी जोडलेला व्यवसाय वाढण्याची आशा त्यामुळे व्यापारी व्यक्त करत आहे. किरकोळ व्यापार, दागिण्यांचा व्यवसाय, खाद्य पदार्थ, परिवहन, उत्पादन आणि अन्य क्षेत्रात मागणी वाढणार आहे.

दागिन्यांवर १.२ लाख कोटी खर्च

सोने आणि चांदीच्या दागिन्यातून अंदाजे १.२ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. यानंतर कपडे आणि पोशाखाचा क्रमांक लागतो, ज्यातून ९०,००० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. भेटवस्तू आणि लग्नाचे साहित्य, किराणा आणि अन्न पुरवठा, आणि इतर क्षेत्रांमधून प्रत्येकी ३७,५०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची आशा आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सुका मेवा आणि मिठाई, आणि फर्निचर व घरगुती वस्तू यांमधून प्रत्येकी ३०,००० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

फुलांवर ३७,५०० कोटी डॉलर्सचा खर्च

लग्नातील खाद्यपदार्थ आणि पेयांमधून ७५,००० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. लग्नाची ठिकाणे, बँक्वेट हॉल आणि हॉटेल्समधून ६०,००० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आणि वेडिंग प्लॅनिंग सेवा, फुलांची सजावट आणि लग्नाची सजावट यांमधून प्रत्येकी ३७,५०० कोटी रुपयाचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.  लग्नसमारंभांमुळे आर्थिक घडामोडींना चालना मिळेल असे कॅटचे ​​(CAT) महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us